कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी बेड कमी पडू देणार नाही, वेळप्रसंगी… – आयुक्त विक्रम कुमार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील सर्वाधिक रुग्णाची संख्या पुणे जिल्ह्यात असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी पुणे प्रशासनाने कडक निर्बध लावले आहेत. तर शहरात दैनंदिन कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत असल्याने वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, परंतु कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही, असे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.

आयुक्त कुमार यांनी शहरातील कोरोना परिस्थितीच्या आढाव्याबद्ल आणि वैद्यकीय यंत्रणेवर बोलताना म्हणाले, बाणेर येथील ESI रुग्णालय ताब्यात घेणार असून १३० बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येणार आहे. तसेच खासगी रुग्णालयामध्ये बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आगामी ५ दिवसांत ५० व्हेंटिलेटर वाढवणार आहोत. आता एकूण ४०० ऑक्सिजन बेड शिल्लक असून आणखी ३५० बेड्स येत्या ३ ते ४ दिवसात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. तर शहरात महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण २५ हजार खासगी रुग्णालयांकडे ४५ हजार डोस शिल्लक आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण १२५ केंद्र सुरू आहे. रोज २० ते २२ हजार लोकांना लसींचा डोस दिला जात आहे.

पुढे विक्रम कुमार म्हणाले, शहरात आज दोन हजार तर उद्या आणखी अधिक रेमीडिसिव्हर औषधांचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रेमीडिसिव्हरचा निर्माण झालेला तुटवडा भासणार नाही. महापालिकेचे कॉल सेंटरकडे खासगी संस्थेकडे चालवायला देण्यात येणार आहे. रोज ५०० फोन येत असून १५ हेल्प लाईन कार्यरत आहेत. तसेच, गेल्या ३० दिवसांत ५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. तर होम आयसोलेशन रुग्णांनी घरी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. तर शहरातील आणखी ६ खासगी हॉस्पिटल कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करू, परंतु कुठल्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी अधिकाधिक रुग्णालय ताब्यात घेतले जातील. सध्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ८०० पैकी ६०० बेड्स कार्यरत आहेत. तसेच ५० ऑक्सिजन आणि ३० व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.