माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करू : पोलीस आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माथाडी कामगार संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळण्याचे प्रकार शहरात सर्रासपणे सुरु आहेत. मागील महिन्यात अशा खंडणीखोरांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगाचा रस्ताही दाखवला आहे. अशा प्रकारे माथाडीच्या नावाखाली खंडणीची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी दिला आहे.

माथडींच्या नावाखाली सुरु असलेली दादागिरी तसेच खंडणीखोरी पोलिसांनी रोखावी, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून करण्यात आली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी अशा खंडणी उकळणाऱ्यांविरोधात न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले. तसेच अप्पर पोलीस आयुक्त देशपांडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांचे मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांना देण्यात आले.

सहकार्यातून सुरक्षिततेकडे ही योजना पुणे पोलिसांकडून शहरात राबविली जात आहे. या योजने अंतर्गत व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागात किमान एकतरी सीसीटिव्ही कॅमेरा लावावा. दर्शनी भागात कॅमेरे बसविल्याने पदपथ आणि रस्त्यांवरील हालचालींवर लक्ष ठेवता येईल व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे यांनी केले.

या बैठकीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते. पुणे व्यापारी महासंघाचे सर्व व्यापारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us