राष्ट्रपती राजवटीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ‘ही’ भूमिका, ‘या’ बडया नेत्यानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी दिली आहे. आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. निवडणुकीच्या निकालापासून हुसेन दलवाई शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल आहेत.

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीनंतर हुसेन दलवाई म्हणाले की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ द्यायची नाही. भाजपचे सरकार बनू नये, यासाठी कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढायला हवा. भाजपने माहाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, मजूरांची, कारखान्यांची, शिक्षणाची, सामाजिक व्यवस्थेची, अर्थकारणाची वाट लावली आहे. त्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर ठेवायला हवे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा. भाजपचं राजकारण टोकाचं आहे.’

राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Visit : Policenama.com