Coronavirus : आता कोणत्याही कंपन्यांचं ‘नेटवर्क’ येईल वापरता ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनच्या काळात टेलीकॉम नेटवर्कवर व्हाईस कॉल आणि इंटरनेटचा वापर वाढल्याने टेलीकॉम कंपन्यांसमोर एक मोठं संकट निर्माण झालं आहे. टेलिकॉम कंपन्यांवर लोड वाढल्याने हा लोड कमी करण्यासाठी कंपन्यांनी आता इंट्रा सर्कल रोमिंग (ICR) उघडण्याचा विचार केला आहे. हे झाल्यास ग्राहकाला कोणत्याही कंपनीचं नेटवर्क वापरता येणार आहे. यासंबंधी भारती एअरटेलने वोडाफोन, आयडिया, रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एमटीएनएल कंपन्यांना पत्र लिहिलं आहे.

सध्या देशात लॉक डाऊन असल्याने देशभरातील कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. तसेच मोबाईल डेटाचाही वापर वाढला आहे. त्यामुळे निश्चितच टेलीकॉम कंपन्यांवरील लोड वाढला आहे.त्यामुळे हा लोड कमी करण्यासाठी इंट्रा सर्कल रोमींग उघडण्याचा कंपन्यांचा विचार आहे.

काय आहे इंट्रा सर्कल रोमींग ?
जर एखादा आयडीयाचा ग्राहक कॉल करत असेल आणि त्याला त्या ठिकाणी नेटवर्क कमी मिळत असेल तर त्या ग्राहकाला जिओ किंवा एअरटेलचे किंवा वोडाफोनचे स्ट्रॉंग असलेले नेटवर्क मिळेल. त्यासोबतच ग्राहक जर डेटाचा वापर करत असेल तर त्याला लो स्पीड इंटरनेट मिळत असल्यास तो तात्काळ इतर नेटवर्कवर शिफ्ट होईल. त्यामुळे त्याला फास्ट डेटा मिळेल