उदयनराजेंच्या संपत्तीत ‘घट’, कॅशमध्ये ‘घसरण’, 7 किलोनं सोनं झालं ‘कमी’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन  – भाजपचे राज्यसभेचे उमेदवार व सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे. चार महिन्यापूर्वीच उदयनराजे यांनी सातारा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना देखील प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केला होता. या दोन्ही प्रतिज्ञांपत्रातील माहितीची तुलना करता अवघ्या काही महिन्यातच उदयनराजेंच्या संपत्तीत घट झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येत आहे की, त्याची जंगम मालमत्ता तीन लाख 46 हजार 979 रुपयांनी कमी झाली आहे. तसेच स्थावर मालमत्ता दोन लाख 86 हजारांनी कमी झाली आहे. त्यांच्यावरील कर्ज 55 लाख 67 हजार रुपयांनी वाढले आहे. तसेच त्यांच्याकडील 25 लाखांची रोखड 8.25 लाखांवर आली आहे. म्हणजेच त्यांच्याकडील रोख रक्कम तब्बल 16.78 लाखांनी कमी झाली आहे. 37 किलो असलेले सोने आता 30 किलो झाले आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 13कोटी 53 लाख 33 हजार 215 रूपयांची जंगम मालमत्ता आहे. तर एक कोटी 10 लाख 23 हजार 075 रूपयांची स्वतः खरेदी केलेली स्थावर मालमत्ता आहे. स्वसंपादित मालमत्ता 22 कोटी चार लाख 81 हजार रूपयांची आहे. वारसाहक्काची मालमत्ता एक अब्ज 35 कोटी 20लाख 32 हजार 190 रूपयांची आहे.

उदयनराजेंकडे दीड कोटी रूपयांचा अलिशान गाड्या आहेत. यामध्ये दोन मर्सिडिझ बेन्ज, एंन्डीवर, ऑडी आणि मारूती जिप्सी आहे. तर पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे चार लाखांची पोलो कार आहे. तसेच त्यांच्याकडे 30 किलो सोने असून त्याची किंमत एक कोटी 80 लाख 53 हजार 317 रूपये आहे. त्यांच्याकडील सोने मागील वेळेपेक्षा सात किलोंनी कमी झाले आहे. मागील प्रतिज्ञापत्रात 37 किलो सोने असल्याचे नमूद केले होते. त्यांच्यावर एक कोटी 81 लाख 55 हजार 222 रूपयांचे कर्ज आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्यावर 35 लाख 69 हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज होते. त्यांच्यावर 55 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज वाढले आहे. दोन मर्सिडिझ बेन्ज गाड्या खरेदी केल्योन हे कर्ज वाढले आहे. पत्नीकडे 39 लाख 46 हजार 985 रूपयांचे दागिने आहेत. मुलगी नयनताराराजे यांच्याकडे तीन लाखांचे दागिने आहेत.

उदयनराजेंकडे असलेली अब्जावधी रूपयांची जमीन ही सातारा शहर, धनगरवाडी, सोनगाव तर्फ सातारा, पेट्री, कोडोली, नवीलोटेवाडी ता. सांगोला, सोलापूर येथील आहे. तसेच सातार्‍यातील बिगरशेती तीन लाख 60 हजार 593 चौरसफुट जमीन आहे. तीची किंमत 18 कोटी 31 लाख 09 हजार 997 रूपये आहे. तसेच वाणिज्य इमारती 26 लाख 37 हजार रूपयांचा आहेत. निवासी इमारतींमध्ये रविवार पेठ सातारा, कोरेगाव पार्क पुणे, कल्याणीनगर पुणे येथे सहा हजार 877 चौरस फूट बंगल आहे. यांची किंमत 22 कोटी 31 लाख 92 हजार 669 रूपये होते.

उदयनराजे यांच्याकडे आठ लाख 25 हजारांची तर पत्नी दमयंतीराजे यांच्याकडे एक लाख 85 हजार रूपयांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. उदयनराजे यांच्यावर एक कोटी 81 लाखांचे कर्ज आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यक्तिगत कर्ज 66 लाख 12 हजार 314 रूपये, तर डायमेलर फायनान्सियल सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडचे 59 लाख 60 हजार 579 रूपये आहे. उदयनराजेंचे शिक्षण एचएससी 1984 फर्ग्यूसन कॉलेज, पुणे येथे झाल्याचे नमूद केले आहे. उदयनराजेंनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती, व्याजाचे उत्पन्न, पगार व इतर असे दर्शवले आहे.

शेअर्स, बंधपत्रे, ऋणपत्रे, म्युचुअल फंडात एकुण 57 लाख 83 हजार 469 रूपयांची गुंतवणूक आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांची गुंतवणूक एक कोटी 24 लाख 28 हजार 589 रुपये होती. त्यांची गुंतवणूक 66 लाख 45 हजार 120 रुपयांनी कमी झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, जनता बँक, कर्‍हाउ अर्बन बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ठेवी असून एकुण 81 लाख 21 हजार 293 रूपयांच्या ठेवी आहेत. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या विविध बँकांत 71लाख 84 हजार 963 रुपयांच्या ठेवी होत्या. यामध्ये चार महिन्यात नऊ लाख 36 हजार 330 रुपयांनी वाढ झाली आहे.