‘इथं’ श्रीमंतांनी अ‍ॅम्बुलन्सला बनवलं टॅक्सी, काही मिनिटातच ट्रॅफिकमधून ‘भुर्रर्र’

तेहरान : वृत्तसंस्था – वाढत्या ट्रॅफिकच्या समस्येने पूर्ण जगातील लोक हैराण आहेत. इराणची राजधानी तेहरान या शहरात सेलिब्रिटी आणि श्रीमंत व्यक्तींनी ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय शोधला आहे. वैद्यकीय सेवेचा दुरुपयोग करून ते रुग्णवाहिका कॅब म्हणून वापरत आहेत.

तेहरान शहराची लोकसंख्या 1 कोटी 40 लाख आहे. शहरातील अनियंत्रित बांधकाम आणि विकासामुळे जोरदार वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवसभर लोकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे. परंतु हे टाळण्यासाठी श्रीमंतांनी रुग्णवाहिकांचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच प्रसिद्ध फुटबॉलरने नाजी खाजगी रुग्णवाहिका सेवेला कॉल करून रुग्णवाहिकेची मागणी केली. पण आपल्या घरात आजारी नसल्याचे त्याने उघडपणे सांगितले होते. त्याला टॅक्सी म्हणून रूग्णवाहिका वापरण्यासाठी हवी होती. नाजी खाजगी रुग्णवाहिका सेवेचे महमूद रहीमी यांनी माहिती दिली की, अभिनेते, खेळाडू आणि श्रीमंत लोक अशा प्रकारे कॉल करतात.

तेहरानच्या खाजगी रुग्णवाहिका सेवेच्या प्रमुख, मोजताबा लहारसेबी म्हणाले की, रुग्णवाहिका कॅब म्हणून वापरण्याचे प्रकार खूपच वाढले आहेत. वैद्यकीय सेवेचा दुरुपयोग करणे हे केवळ सेलिब्रेटींपुरतेच मर्यादित नाही. तर बर्‍याच वेळा खासगी शिकवणी शिक्षक देखील रुग्णवाहिका टॅक्सी म्हणून वापरतात जेणेकरून ते वेळेवर पोहचू शकतील.

नाजी खाजगी रुग्णवाहिका सेवेचे महमूद रहीमी म्हणाले की, आता बरेच लोक रुग्णवाहिका चालकांना मार्ग देत नाहीत. कारण त्यांना वाटते की ही रुग्णवाहिका रुग्णाला नाही तर सेलिब्रेटीला घेऊन जात आहे. वैद्यकीय सेवेचा दुरुपयोग केल्याबद्दल सोशल मीडियावर टीका करताना इराणी लोकांनी म्हंटले आहे की आता SNAP या लोकप्रिय टॅक्सी अपने आता एक रुग्णवाहिका सेवा सुरू केली पाहिजे.

या घटनांना आळा बसण्यासाठी तेहरानच्या महानिरीक्षकांनी एक आदेश काढला असून त्यांनी रुग्णवाहिकांच्या गैरवापर करणारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रुग्णवाहिकांच्या गैरवापर करणाऱ्या कंपन्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या