कोटयाधीशानं लाईन तोडून अभिनेत्री पत्नीसोबत घेतली ‘लस’, इज्जत अन् नोकरी देखील…

कॅनडा : वृत्तसंस्था
जगभरात कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकुळ घातला आहे. कोरोना व्हायरसवर आता व्हॅक्सीन आली आहे. मात्र, ही व्हॅक्सीन ठराविक लोकांना देण्यात येत आहे. मात्र कॅनडातील एका श्रीमंत व्यक्तीला व्हॅक्सीन घेतल्यामुळे सीईओ पदाची नोकरी गमवावी लागली. कारण तो वेळेपूर्वीच वॅक्सीन घेण्यासाठी खोटं सांगून गेला होता. एका कॅसिनो कंपनीचा सीईओ असलेल्या रॉडनी बेकरने (वय-55) वेळेपूर्वीच कोरोना वॅक्सीन घेण्यासाठी चार्टर्ड प्लेन हायर केलं आणि आपल्या अभिनेत्री पत्नीसोबत कॅनडातील एका दूर भागात गेला. त्या ठिकाणी या दोघांनी एकाटेलचे कर्मचारी असल्याचे सांगितले होते.
रोडनी याने आपल्या 32 वर्षीय पत्नी एकातेरिना बेकरला सोबत घेऊन वॅक्सीन घेण्यासाठी गेला होता. कॅनडातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोट्याधीश व्यक्तीने स्थानिक सिव्हील इमर्जन्सी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. कपल 19 जानेवारी रोजी युकोनची राजधानी व्हाइटहॉर्सला गेले होते. त्यांनी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी देखील पूर्ण केला आहे. मात्र, त्यांनी एका नव्या हॉटेलचे कर्मचारी असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना मॉडर्नाची वॅक्सीन देण्यात आली. परंतु आता त्यांचा भाडाफोड झाल्याने या दोघांना वॅक्सीनचा दुसरा डोस उशीरा दिला जाऊ शकतो.
कॅनडामध्ये कोरोना लसीकरण हळुवार होत असल्याची टीका सरकारवर होत आहे. त्यामुळे कॅनडातील अनेक लोक अमेरिकेत जाऊन कोरोना वॅक्सीन घेत आहेत. तरी देखील या कोट्याधीश कपलने लाईन तोडून वॅक्सीन घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. असे ही सांगितले जात आहे की, या कपलने क्वारंटाईन नियमांचे पालन न केल्याने या परिसरातील इन्डिजनस लोकांच्या आरोग्याला धोका पोहचवला आहे. स्थानिक कायदा तोडल्याप्रकरणी त्यांना लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो.
या कपलचा भांडाफोड तेव्हा झाला जेव्हा स्थानिक लोकांना त्यांच्यावर संशय आला. आधी लोकांनी कपलने सांगितलेल्या हॉटेलमध्ये फोन करुन विचारणा केली. तेव्हा सकारात्मक उत्तर न मिळाल्याने स्थानिकांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर खरे प्ररकण उघडकीस आले. मात्र, या प्रकारामुळे सीईओ पदाची नोकरी तर गेली शिवाय इज्जत देखील गेली.