हत्यारांची तस्करी करणारा बंटी पवार टोळीतील सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हत्यारांची तस्करी करणारा आणि बंटी पवार टोळीतील सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी पिस्टलसह अटक केली. ही कारवाई तुकाई नगर सर्कल येथे करण्यात आली.

दुर्गा बाबु महतो (वय-३० रा. कॉलेज रस्ता, वडगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दुर्गा महतो याच्यावर यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी त्याच्याकडून ८ गावठी पिस्टल जप्त केले आहेत.

…अन्यथा पुन्हा खळ्ळखट्याक : राज ठाकरे

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे पाटील व दत्ता सोनवणे हे गस्त घालत होते. गस्ती दरम्यान त्यांना तुकाईनगर सर्कल जवळ एक संशयीत आरोपी उभा असून त्याच्याजवळ पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेली माहिती वरिष्ठांना सांगून तुकाईनगर येथे सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी बनावटीची पिस्टल आणि एक जीवंत काडतुस जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेला आरोपी दुर्गा महतो हा सराईत गुन्हेगार असून तो बंटी पवार टोळीचा सदस्य आहे. तसेच तो शस्त्रांची तस्करी करण्याचे काम करतो. त्याच्याकडून यापूर्वी ८ गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहेत. महतो याच्यावर वारजे, दत्तवाडी, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

वाळू माफीयांची नविन शक्कल… पावती एक आणि फेऱ्या डबल

ही कारवाई परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सिहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहीते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीसी निरीक्षक (गुन्हे) संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, श्रीकांत दगडे, मयुर शिंदे, अविनाश कोंडे, वामन जाधव यांच्या पथकाने केली.