आता कॅन्सरचे निदान आणि उपचार करणे झाले अधिक सोपे

कॅन्सर सेल्स ओळखणारे डिवाइस विकसित

वृत्तसंस्था : कॅन्सर एक प्राणघातक रोग आहे आणि पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे तो होत असतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे, पण अनेकदा कॅन्सरचे निदान पटकन होत नाही. रुग्णाच्या शरीरातील कोणता भाग कॅन्सरग्रस्त आहे याचे निदान करणेही डॉक्‍टरांना अवघड होते. पण शरीरातील सूक्ष्म पेशींच्या माध्यमातून आता कॅन्सरचे अचूक निदान करून त्यावर योग्य तो उपचार करणे सोपे होणार आहे. कारण शास्रज्ञांनी असा डिवाइस तयार केला आहे, जे थेट रुग्णाच्या रक्तातून कॅन्सर सेल्स एकत्र करू शकतं. त्यामुळे आता कॅन्सरची माहिती मिळवण्यासाठी बायॉप्सी करण्याची गरज पडणार नाही.

अशी मिळेल कॅन्सरच्या सेल्सची माहिती –

कॅन्सरच निदान करणार डिवाइस थेट रुग्णाच्या रक्तातून कॅन्सर सेल्स एकत्र करू शकणार आहेत. या डिवाइसमुळे काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचं स्क्रीनिंग करून त्यातील कॅन्सरच्या सेल्सची माहिती मिळवता येऊ शकते. हे डिवाइस काही तासांमध्येच नसांमधील कॅन्सरचे सेल्स पकडतं. जास्तीत जास्त रक्ताची तपासणी याने केली जाते.

कॅन्सर हा बदलणारा आजार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच प्रकारची उपचारपद्धती वापरता येत नाही. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर कॅन्सरचे स्वरूप उलगडून त्यावर उपचार करणे आवश्‍यक झाले आहे.