विधायक ! तरुण नेत्याने PPE कीट घालून संशयिताला दुचाकीवरुन नेले रुग्णालयात

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या भीतीने नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्याच्या काही घटनाही घडल्या आहेत. अशाच पश्चिम बंगालमध्ये मात्र एका स्थानिक नेत्याने कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला चक्क बाईकवरुन चाचणीसाठी घेऊन नेले आहे. रुग्णाला मदत करण्यासाठी नेत्याने आधी स्वत:च्या पैशाने पीपीई कीट विकत घेतले. त्यानंतर मग पीपीई कीटमध्येच बाईक चालवत तो या रुग्णाला चाचणीसाठी रुग्णालयात घेऊन गेला आहे. सत्यकाम पटानाईक असे या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्याचे नाव आहे.

सिजूआ गावातील एका स्थलांतरित मजूरामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचे सत्यकाम यांना जाणवले. मात्र या व्यक्तीला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्यामुळेच त्याने स्वत: या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरविले. या व्यक्तीची मदत करण्यासाठी सत्यकामने आधी पीपीई कीट विकत घेतले. त्यानंतर एका मित्राकडून बाईक घेऊन तो थेट सिजूआ गावी पोहचला. या गावामधील 43 वर्षीय अमाल बारीक यांना बाईकवर मागे बसवून तो थेट स्थानिक रुग्णालयामध्ये गेला. तेथे कोरोना चाचणीसाठी अमाल यांचे स्वॅब सॅम्पल घेण्यात आले. चाचणीचा निकाल येईपर्यंत घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. ही चाचणी झाल्यानंतर सत्यकाम याने अमाल यांना पुन्हा घरी आणून सोडले आहे. सत्यकाम यांने पुढाकार घेऊन स्वखर्चाने केलेल्या या कामाचे आता सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पीपीई कीट घालून बाईक चालवणारा सत्यकाम आणि त्याच्या मागे मास्क लावून बसलेल्या अमालचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like