Weather Alert 12 June : शुक्रवारी ‘या’ 7 राज्यात होऊ शकतो जोरदार पाऊस, बिघडेल हवामान, सावध राहा

नवी दिल्ली : शुक्रवारी देशातील अनेक राज्यात हवामान बिघडू शकते. जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. 7 राज्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय पाच ते आठ अशी राज्य आहेत, जेथे हलका ते मध्यम पाऊस होईल. काही भागात वीजासुद्धा चमकतील. उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्वोत्तरच्या राज्यांत जास्त पाऊस होण्याचा धोका आहे. जाणून घेवूयात पुढील 24 तासात कोणत्या भागात पाऊस पडणार आहे.

– पुढील 24 तासात आंध्र प्रदेश, तेलंगना, विदर्भ, मराठवाडा, केरळ, कर्नाटकचा किनारा, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर भारताच्या काही भागात जोरदार ते अतिवृष्टी होण्याची होण्याची शक्यता आहे.

– पुढील 24 तासात अंतर्गत कर्नाटक, कोंकण आणि गोवा, गुजरात क्षेत्र, जम्मू-काश्मीर, मुजफ्फराबाद, झारखंड, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

– पुढील 24 तासात दक्षिण राजस्थान, पंजाब, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगढच्या काही भागात हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे.

* या शहरात वादळ, वारा, पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता

– राजस्थानचे अजमेर, अलवर, भरतपुर, भीलवाड़ा, बूंदी, चितौडबढ, चुरू, दौसा, धौलपुर, जयपुर, झुंझुनूं, कोटा, नागौर, नीमच, राजसमंद, सवाई माधोपुर, सिकंदराबादमध्ये जोरदार वार्‍यासह धुळीचे वादळ होऊ शकते. तसेच गर्जनेसह तुरळक पाऊस पडू शकतो.

– मध्य प्रदेशमध्ये जोरदार वार्‍यासह वादळ आणि गर्जनेसह पाऊस होईल. येथे मालवा, अनूपपुर, अशोकनगर, बालाघाट, भोपाळ, छिंदवाड़ा, दमोह, देवास, नरसिंहपुर, पन्ना, रायसेन, राजगढ़, रतलाम, रीवा, सागर, सतना, सीहोर, सिवनी, शहडोल, शाजापुर, शिवपुरी, सीधी, उज्जैन, उमरिया, विदिशा डिंडोरी, गुना, होशंगाबाद, इंदौर, जबलपुर, कटनी, मंडला आदी शहरे पावसाने प्रभावित होतील.

– नागालँडमध्ये पुढील 6-8 तासात दीमापुर, किपशायर, कोहिमा, लोंगलेंग, मोकोकचुंग, मोन, पेरेन, फेक, तुनेसांग, वोखा आणि जुनहेबोटो जिल्ह्यात जोरदार वार्‍यासह हलका पाऊस होऊ शकतो.

पुढील दोन ते तीन दिवसाचा हा आहे अंदाज

स्कायमेट वेदरनुसार पुढील दोन-तीन दिवसात आंध्र प्रदेश, तेलंगना, दक्षिण ओडिसा आणि महाराष्ट्राच्या विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

अंदाज आहे की, मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य काही भागात तसेच कोलकातासह पश्चिम बंगालमध्ये पुढील 24 ते 48 तासात मान्सून धडकणार आहे. मान्सून पुढे सरकण्यासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस होईल. बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून चांगली प्रगती करत आहे. सिस्टम पुढे सरकण्यासह एकीकडे दक्षिण भारतात पावसाच्या हालचाली वाढत चालल्या आहेत. तर दुसरीकडे मध्य भारतात मान्सून प्रगती करत आहे.