Weather Alert | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – यंदा राज्यात मॉन्सूनचं (Monsoon in Maharashtra) आगमन अपेक्षेपेक्षा लवकर झालंय. यामुळे बळीराजा सुखावला आहे. मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Weather Alert) पडत आहे. हवामान विभागाकडून (Meteorological Department) राज्यातील पुणे, सातारा आणि रत्नागिरीला (Pune, Satara and Ratnagiri) आज (गुरुवार) रेड अलर्ट (Red alert) देण्यात आला आहे. ठाण्यात (Thane) मुसळधार पावसाला (Torrential rain) सुरुवात झाली आहे. पुणे शहरात (Pune City) मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. परंतु, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस (Weather Alert) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

मुंबई व उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने मुंबई व उपनगरमध्ये पुढील दोन तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई (Mumbai) आणि उपनगरमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाकडून मुंबई, उपनगरे आणि ठाण्यामध्ये (Thane) अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरबी समुद्रातील उत्तर कोकणाजवळ (North Konkan) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पुढील 2 ते 3 दिवस कोकणात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विजेच्या कडकडाटासह पाऊस

मुंबईजवळच्या सांताक्रूझ (Santacruz), विरार (Virar), पालघर डहाणू (Palghar Dahanu), बोरीवली (Borivali), कल्याण (Kalyan), पनवेल (Panvel), अलिबाग (Alibag), खंडाळा घाट (Khandala Ghat) या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून (regional meteorological centre Mumbai) वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार तास मध्यम स्वरुपाचा पाऊस या भागात होईल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुण्यात पाऊस
पुणे शहरामध्ये (Pune City) पहाटेपासून पावसाला (Rain) सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Wab Title :- weather alert chance of rain across maharashtra red alert in pune satara and ratnagiri

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

कोविड टास्क फोर्सने दिला सावधानतेचा इशारा, म्हणाले – ‘2 ते 4 आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट’