Weather Alert | पावसाने दिली ओढ; 11 जुलैनंतर पुन्हा पावसाला सुरूवात होणार

पुणे (Pune) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune News । Weather Alert | जूनच्या सुरुवातीला सुरु झालेल्या पावसाने (Rain) आता ओढ दिली आहे. २० जूनपासून मान्सूनमध्ये (Monsoon) कोणतीही प्रगती झालेली नाही. शुक्रवारी राज्यात सर्वात कमी पावसाची नाेंद करण्यात आली असून पुढील आठवडाभर तरी राज्यात अशीच परिस्थिती राहणार असल्याचे हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र चिंतेचे ढग दाटून आले असून ११ जुलैनंतर राज्यात पावसाची (Rain) सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे.(Weather Alert)

air india announces e auction | दिल्ली-मुंबईसारख्या शहरामध्ये १३ लाखात घर घेण्याची संधी

weather alert cloud tension state due rain start rain again after july 11

दरम्यान,शनिवारी सकाळी गेल्या २४ तासात कोकणातील पणजी, राजापूर येथे हलका पाऊस (Rain) झाला तर मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) गगनबावडा (Gaganbawda) आणि पन्हाळा (Panhala) येथे पावसाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडला होता. २० जून नंतर कोकण मध्य महाराष्ट्राच्या ( ​​Konkan Central Maharashtra)  धरण पाणलोट क्षेत्रासह ( Dam catchment area) विदर्भातही मोठ्या प्रमाणावर पावसाने ओढ दिली आहे.

Sanjay Raut and Ashish Shelar | भाजप- शिवसेना एकत्र येणावरून पुन्हा चर्चा; संजय राऊत म्हणतात..

त्यामुळे सर्वत्र चिंतेचे ढग दाटून आले. शेतीची कामे देखील खोळंबली असून अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. गत आठवड्यातील सरासरीच्या तुलनेत राज्यातील अहमदनगर (Ahmednagar) , सोलापूर (Solapur), उस्मानाबाद (Osmanabad) , जालना (Jalna), जळगाव (Jalgaon) , औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस (Rain) झाला. पुणे (Pune) , सातारा (Satara) , सांगली (Sangali) , कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्याहून अधिक तूट आढळून आली. तर २० टक्क्यांहून अधिक प्रमाणात १४ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस (Rain) झाला आहे.

Pune News | चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘मी पत्र लिहू नये हीच तर तुमची हुकूमशाही’

हवामान विभागाने (Meteorological Department) पुढील दोन आठवड्यांच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्याच्या स्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून पुढील चार दिवस कोकणात कोठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र,मध्य महाराष्ट्रात ६ व ७ जुलै रोजी काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटांसह पाऊस (Rain) होईल. तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात (९ ते १५ जुलै) पावसाला सुरुवात होणार आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), मराठवाड्यातील (Marathwada) सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अधिक तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागने (Meteorological Department) म्हंटले आहे.

Ahmednagar Crime News | पोलिसांकडून तरुणाचा छळ, सोशल मीडियात पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या; शहरात खळबळ

पाऊस न पडण्यामागे काय आहे कारण

जूनच्या सुरुवातीला सुरु झालेल्या पावसाने अचानक ओढ दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक असा काय बदला झाला की पावसाने ओढ दिली. यासंदर्भात बोलताना हवामान शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, की विषुवृत्तीय भागातील आफ्रिकेत पावसाची सुरुवात झाली की, तेथील शुष्क हवा आपल्याकडे ढकलली जाते. या हवेमध्ये धुलकणांचे प्रमाण अधिक असल्याने आकाशात काळे ढग दिसतात.

Pimpri Crime News | कला दिग्दर्शक राजू साप्ते आत्महत्या प्रकरणी चंदन ठाकरेला मुंबईहून अटक; बॉलीवूडमधील गुंड नेत्यांची खंडणीखोरी उघड, 5 जणांवर वाकड पोलीस ठाण्यात FIR

पण त्यांना उंचावर जाण्यास हे धुलीकण रोख असतात. ढगांची निर्मिती होऊन त्यामध्ये बाष्प असले
तरी बाहेरील हवेतील शुष्क हवा त्यांचे थेंबात रुपांतर करण्यापासून रोखतात. किंबहूना त्या
ढगांमधील पाणी कमी होते. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेले पोषण वातावरण तयार
होत नाही. सध्याही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काळे ढग दिसत असले तरी
पाऊस पडत नाही. ही परिस्थिती ११ जुलैपर्यंत राहण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाला सुरुवात
होईल असा अंदाज कुलकर्णी यांनी वर्तवला आहे.

 
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : weather alert cloud tension state due rain start rain again after july 11

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update