देशातील बर्‍याच राज्यात वाढणार तापमानाचा पारा, तर ‘या’ राज्यांना उष्णतेपासून मिळणार दिलासा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय हवामानशास्त्र विभागाने ( IMD) मार्च ते मे दरम्यानचा आपला उन्हाळ्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, “येत्या उन्हाळ्यात (मार्च ते मे पर्यंत), उत्तर, वायव्य आणि ईशान्य भारतातील बहुतांश उपविभागांमध्ये आणि मध्य भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागातील काही उपविभाग आणि उत्तर द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावरील उपविभागांमध्ये तपमान सामान्यपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. परंतु दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या मध्य भारतातील जास्तीत जास्त उपविभागांमध्ये जास्तीत जास्त तापमान सामान्यपेक्षा खाली असण्याची शक्यता आहे.”

या वर्षाच्या थंडीनंतर फेब्रुवारीमध्येच राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीतील उष्णतेने बर्‍याच वर्षांचा विक्रम मोडला आहे. देशातील बर्‍याच राज्यात आता हवामान बदलू लागले आहे. बर्‍याच राज्यात तापमानात वाढ होत आहे. ज्यामुळे दिवसा उष्णता जाणवते. त्याचबरोबर डोंगरावर हिमवादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता वारंवार होत आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह सोमवारी गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथे हिमवादळ आणि पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे, मैदानाच्या तापमानातही घट दिसून येते.