हवामान खात्याकडून मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी

पोलिसनामा ऑनलाईन – हवामान शास्त्र विभागाने मुंबईत ऑरेंज तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामानातल्या या बदलांमुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्याच बरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडले असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. हवामानाच्या या बदलांमुळे सुमुद्र किनारा असलेल्या भागांमध्ये मोठा प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. वार्‍याचा वेगही मोठा प्रमाणात असेल. यादरम्यान, समुद्र खवळलेला असेल. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात उतरू नका असे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे.