Weather Alert | हवामान विभागाचा अलर्ट ! 18 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये होईल जोरदार पाऊस, ‘वीज’ कोसळण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weather Alert | मान्सून निरोप घेण्यापूर्वी देशभरात जोरदार बरसत आहे. देशात मागील आठवडाभरात कुठे थांबून-थांबून तर कुठे जोरदार पाऊस होत आहे. सर्वात जास्त पाऊस गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली-एनसीआरसह अनेक परिसरात झाला आहे. हवामान विभागानुसार (Weather Alert) 18 सप्टेंबरपर्यंत पाऊस असाच राहील. या दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता आहे.

मान्सूनची परतीची तारीख 20 सप्टेंबर सांगितली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून्सच्या निरोपासह गुलाबी थंडी पडण्यास सुरूवात होईल. मात्र, सध्या हवामाना रागरंग पाहता असे वाटत आहे की, यावेळी मान्सूनची निरोपाची तारीख पुढे जाऊ शकते. जोरदार पावसाचे सत्र संपल्यानंतर सुद्धा थोड्याफार पावसाचे सत्र सुरूच राहील.

हवामान विभागाने दिल्ली आणि एनसीआरमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर गुजरात आणि मध्य प्रदेशात सुद्धा दोन्ही दिवस पाऊस जारी राहील. हवामान विभागाने दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊसासंबंधी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पुढील 3-4 दिवसात जोरदार पाऊस होऊ शकतो.
लो प्रेशरमुळे डिप्रेशन उत्तर-पूर्व मध्य प्रदेशकडून उत्तर पश्चिम भारताकडे सरकत आहे.

बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बिहारच्या जवळपास सर्वच जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान विभागाने बिहारमध्ये शनिवारपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज जारी केला आहे.
पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये थांबून-थांबून पाऊस होत आहे.

Web Titel :- Weather Alert | weather forecast monsoon update 16th september mid heavy rain alert many states

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Update | सोने खरेदीदार खुश ! आता 27644 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम सोने, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचे नवीन दर

Coronavirus | घराच्या आत 6 फुटाचे अंतर ठेवून सुद्धा पसरू शकतो ‘कोरोना’, संशोधनात दावा

Tirupati Devasthan Trust | ‘मातोश्री’वरून मुख्यमंत्री ठाकरेंचा CM जगनमोहन रेड्डींना ‘कॉल’; ‘तिरुपती ट्रस्ट’च्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती