राज्यात ‘या’ ठिकाणी ‘मुसळधार’ पावसाची शक्यता, पुन्हा ‘अतिवृष्टी’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने राज्यात बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली होती. त्यानंतर पाऊस आता पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात पाऊस पुन्हा कहर घालण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागात प्रामुख्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला  आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , 18 ते 20 सप्टेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस गायब असल्याचे चित्र आहे. मात्र पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने बुधवारपासून राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. मध्य प्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत मुसळधार  पावसाची शक्यता आहे.

मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात राज्यात जोरदार पाऊस पडला. तसेच  उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.