Weather Forecast | आज पुण्यासह 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या कशी असेल कोकणातील स्थिती ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Weather Forecast | गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला आहे. कमी कालावधीत मुसळधार पाऊस (Heavy rain) पडल्याने राज्यातील काही जिल्ह्यात पुरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. तर पंचगंगा (panchganga river), वाशिष्ठी (Vashishti river) आणि कृष्णा नदीनं (Krishna river) आपलं पात्र सोडलं असून धोक्याच्या पातळीच्यावर पाणी पातळी पोहचली आहे. त्यामुळे शहरी भागात पुराचे पाणी शिरले आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज परिस्थिती नियंत्रणात येत आहे. परंतु पुराचे पाणी अद्याप ओसरले नाही. (weather forecast heavy rainfall expected in pune today)

पुण्यासह 6 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

आज कोकणासह (Konkan) पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका अद्याप कायम आहे. आज पुण्यासह (Pune), सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील 24 तास कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात धोका कायम आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी (Heavy Rainfall) होण्याचा धोका हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

4-5 दिवसांत पूरस्थिती नियंत्रणात येईल
रविवार (दि.25) पासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसांत रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात येऊ शकते. मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पीक वाहून गेली आहेत. तर काहीची जनावरं पाण्यात अडकून पडली आहेत. तर महाड जवळ असलेल्या तळीये गावात दरड कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

Web Title :- weather forecast heavy rainfall expected in pune today what will be the situation in konkan know about that

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | सोनं पुन्हा 1000 रुपयांनी झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

Anti Corruption | 2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 10 लाख पोलिसानं घेतले; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

Covid Vaccination | व्हॅक्सीन घेण्यावरून एकमेकीवर तुटून पडल्या महिला, झाली जोरदार हाणामारी; ओढले एकमेकींचे केस (Video)