बळीराजासाठी आंनदाची बातमी ; उशीरा येऊनही बरसणार समाधानककारक सरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात सर्वत्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. असे असताना भारतीय हवामान खात्याने सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या माहितीनुसार यंदा पाऊस समाधानकारक होणार आहे. तसेच जून ते सप्टेंबर या काळात देशभरात पाऊस सरासरीएवढा होईल अशी दिलासादायक बातमी IMD कडून आली आहे.

राज्यात १५ ते १७ जूनपर्यंत दाखल होणार
सर्वसाधारण मान्सून १ जूनला केरळात दाखल होतो. पण यंदा मात्र मान्सून लांबणीवर पडला आहे. असा अंदाज यापुर्विच हवामान खात्याने वर्तवला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन झाले आहे. पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. त्यामुळे साधारण ६ जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे. राज्यात दाखल होण्यासाठी किमान १५ ते १७ जून उजाडेल असा अंदाज आहे.

ताज्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस होईल. ईशान्य भारतात ९१ टक्के पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षी उत्तर आणि पश्चिम भारतात ९४टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मध्य भारतात यंदा मोसमी पाऊस सर्वाधिक बरसणार आहे. तिथे १०० टक्के पावसाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर काळात सरासरी ९६ टक्के पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचं प्रमाण साधारण किंवा कमी असेल. ऑगस्टमध्ये मात्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.