Weather Forecast | कडाक्याच्या थंडीत देशात ‘या’ भागात बरसणार पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट, काय असेल महाराष्ट्रातील स्थिती?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weather Forecast | राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी (Cold) आहे. पहाडी भागात बर्फवृष्टी (Snowfall) सुरुच आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात पावसाचा अंदाजही (Weather Forecast) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी तामिळनाडूच्या किनारपट्टी (Tamil Nadu Coast) भागांत बुधवारपर्यंत पावसाचा इशारा (Rainfall Forecast) दिला आहे. चेन्नई (Chennai) आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी मध्यम ते मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) झाला. तसेच इतर किनारपट्टी भागांतही मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच, येत्या काही दिवसांत तिरुवल्लूर जिल्ह्यातील (Thiruvallur District) एक किंवा दोन ठिकाणी मुसळधार स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे.

 

शहराच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर चेन्नईचा पारा घसरला (Mercury Dropped) असून किमान तापमान 22.7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. हे तापमान सरासरी 29.3 अंश सेल्सिअसपेक्षा खूप कमी आहे. चेन्नईचे हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक बालचंद्रन (Deputy Director General Balachandran) म्हणाले, उत्तर किनारी प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. मंगळवारीही राज्यातील अनेक भागात हलका पाऊस पडेल. राज्याच्या खालच्या पातळीवरील पूर्वेकडील वारे आणि वरच्या पातळीवरील पश्चिमेकडील वाऱ्यांमळे पाऊस सुरु झाला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. (Weather Forecast)

 

या राज्यात पावसाची शक्यता
आंध्र प्रदेशात 17 जानेवारीपर्यंत किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे. पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी रायलसीमा, तामिळनाडू आणि केरळमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांत पाऊस पडू शकतो. तसेच ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

या राज्यात कडाक्याची थंडी
येत्या दोन दिवसांत दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वेगळ्या भागांमध्ये कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. तर येत्या काही दिवसांत दिल्ली, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये रात्री आणि सकाळच्या वेळी दाट धुके (Fog) पडण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Weather Forecast | imd weather forecast moderate rain over vidarbha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अंगावर गाडी घालतो का असे म्हटल्याने गुंडाने तरुणासह आई, पत्नी, भावाला केली बेदम मारहाण; येरवड्यातील घटना

 

Rupali Chakankar | किरण मानेंना मालिकेतून का काढले? खुलासा करावा; रुपाली चाकणकरांचे निर्मात्यांना पत्र

 

Horoscope (Rashifal) | 18 जानेवारीला सूर्याप्रमाणे चमकणार ‘या’ राशींचे भाग्य, वाचा मेषपासून मीन राशीपर्यंतची स्थिती