राज्यात पावसाची दाणदाण; मुंबईसह कोकणात हवामान खात्याकडून रेड अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात गेल्या काही दिवसापासून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest monsoon rains) अनेक भागात धो-धो केलं आहे. पूर्ण राज्यात पावसाने Rain धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात (Monsoon in Maharashtra) काही जिल्ह्यात मध्यम तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुख्यतः म्हणजे मुबंईत (Mumbai) तर जोरदार पावसाने Rain सुरसपाटाच लावला आहे. आज मुबंईत (Mumbai) सकाळपासूनच मुसळधार पावसाने (Heavy rain) दाणदाण केली आहे. यावरून आता मुबंईत पावसाची गती अधिक वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून (Meteorological Department) वर्तवला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पावसाचा अंदाज घेत हवामान विभागाकडून मुंबई (Mumbai) आणि कोकण (Kokan) विभाग पट्ट्याला रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि कोकण येथे आगामी चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस Rain बरसणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच मूंबईमध्ये दि. 13 आणि 14 जूनला अतिमुसळधार पावसाचा अंदाज (Weather Alert) भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे.
याचबरोबर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत देखील हवामान विभागाकडून रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आगामी काही तासामध्ये मुंबई आणि रायगड याठिकाणी पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Weather Alert) स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.
तसेच, पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस गती घेण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या (Maharashtra) पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस (Heavy rain) धो धो करत आहे. आगामी काही दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे. म्हणून पुढील काही दिवस मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी उद्या आणि परवा अशी दोन दिवस घरातच राहावे. तसेच लांबचा प्रवास टाळण्याच्या सूचना देखील हवामान तज्ज्ञांनी (Meteorologist) दिल्या आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  weather forecast monsoon continues hit in state red alert issued for konkan and mumbai

 

हे देखील वाचा

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा