आगामी 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ 11 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काहीशी विश्रांती घेणाऱ्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनापट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर परिसरात पुढील 48 तास कोसळधार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यभरात ठिकठिकाणी परतीचा पाऊस कोसळत असून, मुंबई, पुण्यात मंगळवारी रात्री पावसाला सुरूवात झाली. रात्रभर विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू असून, सकाळी चार वाजेनंतर पावसाचा जोर वाढला आहे . मुंबई शहरासह नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातही ठिकठिकाणी पाऊस कोसळत आहे. लातूर, सांगली जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. तर नाशिक, बीड, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.

Visit : policenama.com