Weather Alert : ‘या’ राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंत ‘पाऊस’ पडणार, महाराष्ट्रात गारा आणि वादळी वार्‍याचा ‘तडाखा’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मागील काही वर्षांपासून हवामानात सतत बदल होत असताना दिसत आहे. त्यामुळे बळीराज्याच मोठ नुकसान झाले. शुक्रवार राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी रात्री सोलापूर, उस्मानाबाद, आणि अन्य काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती.
सोलापूरमध्ये मध्ये रात्री अचानक पाऊस आल्याने द्राक्ष बागांना मोठ नुकसान झाले, या पाऊसामुळे तालुक्यातील मका, हरबरा आशा अनेक पिकांना नुकसान झाले त्याचबरोबर काही पिके ही उध्वस्त झाली.

त्याचबरोबर नाशिक शहराला ही अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला आहे, शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने रब्बीमधील गहू, ज्वारी पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. फळपीकालाही फटका बसला आहे. काही ठिकाणी हलक्या सारीचा पाऊस झाला तर काही ठिकाणी दमदार असा झाला.

याचबरोबर हवामान खात्याने 1 मार्चपासून हवामान खराब असेल असा अंदाज वर्तवला आहे. 1 ते 2 मार्चनंतरही हा पाऊस कायम राहिल. येत्या 24 तासांत मध्य प्रदेशातील बर्‍याच शहरांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, २४ ते ४८ तासात बऱ्याच राज्यचे हवामान बदलू शकेल. झारखंड, बिहार, ओडिशा मध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल, लडाख, उत्तराखंडसह उत्तर भागात पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह मध्य प्रदेशातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा स्कायमेटचा अंदाज आहे.