Weather Report : हवामान विभागाकडून अलर्ट, आगामी 48 तासात धडकू शकतं चक्रावाती वादळ, अनेक राज्यात होणार मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात रविवारी हलका ते मध्यम पाऊस झाला, ज्यामुळे या भागात आठवडाभर तरी गरमीपासून दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात बदलून ते पश्चिम किनार्‍याकडे जाऊ शकते. दिल्लीत रात्रभर हलका पाऊस आणि दिवसासुद्धा पाऊस झाल्याने कमाल तपामान 36 डिग्री सेल्सियस नोंदले गेले.

भारतीय हवामान विभागाच्या केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी म्हटले की, आठ जूनपूर्वी या क्षेत्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता नाही. मागील आठवड्यात उत्तर भारताच्या काही भागात उष्ण वारे वाहण्यास सुरूवात झाली होती. पश्चिम आणि दक्षिण-पश्चिमी वारे तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने दिल्ली- एनसीआरमध्ये दमट वातावरण राहू शकते. आयएमडीने म्हटले की, तीन जूनपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये कमी दाबाचा तयार झालेला पट्टा एका चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने जारी केला इशारा

अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पुढील 48 तासात चक्रीवादळाचे रूप घेईल. याचा परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावरील भागावर होईल. 3 जूनपर्यत चक्रीवादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावर पोहचू शकते. अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आण ओडिसामध्ये विध्वंस केल्यानंतर काही दिवसात हवामान विभागाने हा इशारा दिला आहे.

आयएमडीने ट्विट करून म्हटले आहे की, पुढील 48 तासात अरबी समुद्रावर तयार झालेला कमी दाबाचा पट्टा चक्रीवादळात आणखी वेग निर्माण करेल, ज्यामुळे पुढील 48 तास धोक्याची स्थिती राहील. हे वादळ 3 जूनच्या सकाळी उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनार्‍यावर पोहचेल. या चक्रीवादळामुळे देशातील अनेक भागात पाऊस पडू शकतो.

मच्छिमारांनी 4 जूनपर्यंत समुद्रात जाऊ नये

हवामान विभागाने सांगितले की, समुद्राची स्थिती खुपच खराब होणार आहे. मच्छिमारांना 4 जूनपर्यंत उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनार्‍यावर न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ अम्फानमुळे 98 मृत्यू झाले आहेत आणि लोखो लोक बेघर झाले. याशिवाय राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.