‘मतदाना’ दिवशी ‘या’ जिल्ह्यात जोरदार ‘पावसाची’ शक्यता, हवामान विभागाकडून ‘ऑरेज अलर्ट’ जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुणे कोकण आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सोमवारी वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारपासून पाश्चिम महाराष्ट्र, कोकणातील वातावरण बदललं आहे. तसेच सोमवारी राज्यात मतदान प्रकिया पार पडणार असताना पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आज सकाळपासूनच मुंबई उपनगरांसह पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु आहे. काही भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. असाच पाऊस सोमवारी बरसण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ वाऱ्यांनी चक्राकर स्थिती निर्माण केली आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे अशी माहिती हवामान विभागाच्या पश्चिम प्रभागाचे सहसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली. मंगळवारपर्यत हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

कुठे कुठे अलर्ट –
सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊसही होऊ शकतो. यामुळे येथे ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे, या जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता –
बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता –
कोकणात पुढचा आठवडाभर हवामान ढगाळ राहणार आहे, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like