आगामी 3 दिवस चालूच राहणार कडाक्याची थंडी, दिल्ली-उत्तरप्रदेशासह ‘या’ राज्यांचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थंडीमुळे उत्तर भारतातील लोकांची वाईट परिस्थिती आहे. दिल्लीतील थंडीने तर अनेक दिवसांचे रेकॉर्ड तोडले. तापमान घसरून 2.4 अंश सेल्सियसवर पोहचले आहे आणि कडाक्याची थंडी पडलेली आहे. येत्या दोन ते दिवस अशी थंडगार हवा सुरूच राहणार आहे ज्यामुळे तापमानात अजून घसरण होऊ शकते. युपी आणि राजस्थानमध्ये थंडी कशी स्वरूपाची आहे याबाबत जाणून घेऊयात.
उत्तरप्रदेशात कडाक्याची थंडी आहे
उत्तरप्रदेशात देखील कडाक्याची थंडी पडलेली आहे. गोरखपूर येथे तापमान पाच अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावर शांतात पहायला मिळत आहे. आग्र्यामध्ये देखील कडाक्याची थंडी पडलेली दिसून येते त्यामुळे येथील बारावी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
थंडीपासून वाचण्यासाठी लोक शेकोटीचा सहारा घेत आहेत परंतु तापमान इतके वाढत आहे की, शेकोटी सुद्धा कमी पडत आहे. मथुरेत थंडीसोबत पडणाऱ्या धुक्यमुळे खूप समस्या उदभवत आहेत. मथुरेत देखील थंडीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये देखील वाढली थंडी
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आणि धुक्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धुके इतके जास्त होते की 20 ते 30 फूट एवढेच दूरचे दिसत होते त्यामुळे वाहन चालकांना मोठा अडसर निर्माण होत होता. माऊंटआबू येथील तापमान देखील मायनस तीन डिग्रीवर गेले आहे. सकाळी गादीवर धुके देखील बर्फाप्रमाणे पडल्यासारखे वाटत होते.
मनालीत थंडी आणि पर्यटकांची मोठी गर्दी
मनाली येथे कडाक्याची थंडी पडल्याने आणि बर्फवृष्टी होत असल्यामुळे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनीही वेळेस मनालीचे तापमान मायनस मध्ये जात आहे. परंतु सकाळनंतर तापमान थोडे नीट झाल्यावर पर्यटक निसर्गाचा आनंद घेताना दिसून येतात. बर्फवृष्टी होत असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर मनालीमध्ये दाखल झाले आहेत.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- 8 तासांपेक्षा जास्त झोप घेता ? ‘या’ 4 प्रकारे जीवाला होऊ शकतो धोका !
- ‘या’ 4 पदार्थांचा आहारात समावेश केला तर वाढेल स्मरणशक्ती !
- ‘अॅसिडिटी’मुळे आहात हैराण ? करा ‘हे’ 4 घरगुती उपाय
- चुकूनही ‘या’ 5 छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा पडू शकतं महागात !
- उचकी थांबवण्यासाठी करा ‘हे’ ९ उपाय करा ! जाणून घ्या
- हसण्याचे ‘हे’ आहेत ७ फायदे, ‘हार्टअटॅक’चा धोकाही होतो कमी
- सावधान ! पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरल्यास होतात ‘हे’ 4 धोके