Weather Update | आगामी 4 दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र भागात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Weather Update | मागील काही आठवड्यापासून राज्यात पावसाने जोर धरला होता. काही जिल्ह्यात तर अति मुसळधार पावसाने दाणादाण केली होती. गेली दोन ते तीन दिवस थोड्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. आता मात्र, पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पाऊस जोर धरणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यात संततधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. तसेच, कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) अधिक पाऊस तर रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात आगामी 4 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने (Meteorological Department) गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
तसेच, रविवारपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तसेच, काही जिल्ह्यात संततधार पावसाचा (Normal rains) अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान, समुद्रकिनारच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहे.
तर, पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) सातारा (Satara), पुणे (Pune) आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे.
पुढच्या आठवड्यात म्हणजे सोमवारसाठी मात्र कुठलाही अलर्ट नसल्याचं म्हटलं आहे. पुढच्या आठवड्यात पाऊस थंबणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

 

या दरम्यान, मागील काही दिवसापासून वातावरणात बदल होत आहे.
काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी कमी पाऊस पडताना दिसत आहे.
राज्यातील पुणे जिल्ह्यात आणि कोकणातील काही भागात असाच काही तासात विक्रमी पाऊस पडला असल्याचं घडल्याचं मागील आठवड्यात पाहायला मिळालं आहे.
राज्यात दमदार पाऊस पडत असल्याने समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि पावसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं, अशा सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

Web Title : Weather Update | heavy rains in some parts of maharashtra predicted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Suspended | पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन, जाणून घ्या प्रकरण

PM Modi | ‘नवीन शिक्षण धोरण कोणत्याही दबावापासून मुक्त, विद्यार्थी काय शिकणारे हे फक्त संस्था ठरवू शकत नाही’ – पीएम मोदी

PMRDA विकास आराखड्याचे प्रारूप मान्य, नागरिकांच्या सुचना व हरकती मागविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे