रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Weather Update | गेल्या महिन्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाने (Rain) राज्यात जलमय वातावरण निर्माण झालं होतं. काही ठिकाणी दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी गंभीर पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. दरम्यान, आगामी 5 दिवस कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) बऱ्याच जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने राज्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. काही दिवस पाऊस गायब झाला आहे. पुन्हा एकदा आता पुनरागमन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी 5 दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोकण (Konkan) विभागात पावसाची शक्यता वर्तवली हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.
पुढील 5 दिवस 11 ऑगस्ट ते 15 दरम्यान अपेक्षित हवामान : pic.twitter.com/5amLfy4Kec
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 11, 2021
या दरम्यान, गेल्या महिन्यात पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी पावसाचा धोका निर्माण झाला होता. तर, आता कोकणातील बहुतांश भागात मध्यम अथवा तुरळक पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवली आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्रासह (Central Maharashtra) दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी तुरळक, हलक्या पाऊसाची शक्यता आले. यात 4 थ्या आणि 5 व्या दिवशी पावसाला गती येण्याची शक्यता आहे. तर, याव्यतिरिक्त मराठावाड्यात (Marathwada) देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
Web Title :- Weather Update | maharashtra rain update upcoming five days rainfall possibility
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Corporation | भाजपच्या ‘त्या’ याचिकेविरोधात शिवसेनेचे ‘भिकमागो’ आंदोलन
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सला मोठी भेट! जाणून घ्या