home page top 1

येत्या 24 तासात अतिवृष्टीचा ‘इशारा’, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर रायगडमध्ये ‘रेड अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून त्याचा आणखी जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर पुढील 24 तासांत रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तास वीजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा अंदाज आहे.

गुरुवारी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज (20 सप्टेंबर) मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस पडतो आहे. काही भागात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वारा आणि पाऊस सुरू आहे. आज पुन्हा पहाटेपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.

धरणे ओव्हर फ्लो होण्याची भीती-
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर तालुक्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाच धरणं सुमारे 92.17 टक्के भरली आहेत. असाच पाऊस सुरू राहिला तर धरणं ओव्हर फ्लो होण्याची भीती आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like