Weather Update | कोकणात ढगाळ वातावरण तर विदर्भात उकाडा; ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Weather Update | राज्यात (Maharashtra) काही दिवसापासून उन्हाचा चटका वाढत असल्याचे दिसते. असे असले तरी राज्यातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तसेच, हवामानाच्या प्रमाणात बदल (Weather Update) झालेला दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता घटत आहे. याचा परिणाम म्हणजे मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भातील (Vidarbha) कमाल तापमानात वाढ (Temperature in Maharashtra) नोंदली आहे.

 

त्याचबरोबर, घाट परिसर, दक्षिण कोकण आणि लगतच्या दक्षिण महाराष्ट्रात मात्र ढगाळ हवामानाची नोंद झालीय. आगामी काही 4 दिवस कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यानंतर राज्यात सर्वत्र तापमानाचा पारा चढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department) सांगण्यात आलं आहे. (Weather Update)

आज (गुरुवार) कोकणासह (Konkan) महाराष्ट्र (Maharashtra), कर्नाटक किनारपट्टी (Karnataka), उत्तर केरळ (North Kerala), पश्चिम मध्य प्रदेश (West Madhya Pradesh) आणि लगतच्या गुजरातमध्ये (Gujarat) ढगाळ हवामानाची नोंद झालीय. तर आज महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या 10 जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद झालीय. आगामी काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बाकी ठिकाणी मात्र कोरडे हवामान राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.

 

या दरम्यान, उद्या शुक्रवारपासून महाराष्ट्रात ढगाळ हवामानाचा जोर काहीसा घटणार आहे.
त्यामुळे कमाल तापमानामध्ये साधारण वाढ होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची शक्यता आहे.
संबंधित जिल्ह्यात हलक्या सरी बरसणार असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

 

Web Title :- Weather Update | temperature rise in vidarbha rainfall possibilities in konkan imd report today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा