पुण्यासह राज्यात आगामी 48 तास मुसळधार पाऊस !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे वेधशाळेने पुण्यासह राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. इतकेच नाही तर बुधवारी रात्रीही विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. 27 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पाऊस राहणार आहे. मध्य महाराष्ट्रासह, कोकण, मराठवाड्याच्या काही भागातही वादळी पावसाची शक्यता आहे. पुणे वेधशाळेचे अधिकारी अनुपम कश्यप यांनी सांगितले आहे की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई वेधशाळेनेही राज्यातील 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरवर्षी थंडीत येणारी दिवाळी आता पावसात साजरी करावी लागणार अशी चिन्हे आहेत. कारण शनिवारपर्यंत राज्यभरात पावसाचं प्रमाण कमी-अधिक असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो.

Visit : Policenama.com