Weather Update | कोकणात पावसाचं पुनरागमन; पुणे, साताऱ्यात हाय अलर्ट जारी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Weather Update | मागील पंधरा दिवसापासून राज्यातील अनेक जिल्हयात पावसाने (Rain) दमदार पुन्हा सुरुवात केली होती. अनेक भागांना पावसानं झोडपून काढलं होतं. मात्र, गेली दोन ते तीन दिवस पावसाची (Rain) गती कमी झाली आहे. मात्र, आता आगामी 3 ते 4 तासात पुण्यासह (Pune) 10 जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) देण्यात आली आहे. आज हवामान खात्यानं दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert) देखील दिला असून या भागात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज (Weather Update) व्यक्त केला आहे.

आज (शुक्रवार) सकाळपासून अरबी समुद्रासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद केलीय. तसेच काही परिसरात अंशतः ढगाळ हवामान आहे. म्हणून खूपच कमी ठिकाणी आज सूर्य दर्शन झालं नाही. याशिवाय वातावरणात गारवा वाढला आहे. दरम्यान आगामी 3 ते 4 तासांत रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबाद आणि जालना याठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार आहे. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे. तसेच आज पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून (Meteorological Department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही तासामध्ये या भागात मुसळधार सरी (Rain) कोसळणार आहेत.

 

मागील 4 ते 5 दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर (Rain) असल्राला आहे.
यांनतर आता आज आज पुन्हा कोकणात सर्वत्र येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.
म्हणून पुन्हा एकदा मान्सून वापसीचे संकेत मिळत आहेत. पण तूर्तास हीच स्थिती आगामी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
या दरम्यान पुण्यासह आज मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केली केला आहे.
म्हणून याठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं (Meteorological Department) वर्तवला आहे.

 

Web Title : Weather Update | weather forecast is rain comeback in konkan imd giver orange alert to pune satara

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | 2 वर्षापासून फरार असलेल्या मारणे टोळीतील दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मग उपयोगी पडतील ‘या’ 5 होम लोन टिप्स

Ginger | आले वजन कमी करते, दररोज ‘या’ पध्दतीनं सेवन करा, जाणून घ्या