पोलीसनामा ऑनलाईन टीम : Weather Update | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यात थंडीचा तडका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात थंडी राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा असाच राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एवढी थंडी आहे कि किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली गेला आहे. (Weather Update)
उत्तर भारताच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर होणार…
उत्तर भारतात पुढील काही दिवसांत हाडे गोठवणारी थंडी पडणार आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता असून ते मायनस ४ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. काश्मीर व हिमाचलात तापमान उणे 2 ते 4 अंशांपर्यंत पोहोचले आहे; पण उत्तर भारतातील पठारी अद्याप तापमान 5 अंशाच्या खाली न आल्याने थंडीची लाट सौम्य आहे. (Weather Update)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ते 19 जानेवारी हे दिवस उत्तर भारतासाठी सर्वाधिक थंडीचे असणार आहेत. त्यातही 16 ते 18 जानेवारी या कालावधीत थंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हुडहुडी भरवणारी थंडी असल्याने लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title :- Weather Update | will heavy cold wave in next two days imd alert
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा
Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंधाचे फोटो नातेवाईकांमध्ये केले व्हायरल