थंडीपासून सध्या तरी नाही मिळणार मुक्तता, ‘या’ राज्यात पडणार पाऊस – IMD

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली-एनसीआर आणि उत्तर भारतातील काही भागात सकाळ आणि संध्याकाळी हलक्या धुक्यासह थंडी पडली. तर दुपारी कडक उन्हामुुळे थंडीपासून लोकांना दिलासा मिळाला. येत्या काही दिवसांबाबत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले की दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात 10 फेब्रुवारी (बुधवार) पर्यंत दाट धुके होण्याची शक्यता आहे. दैनिक हवामान बुलेटिनमध्ये आयएमडीने म्हटले की, येत्या 4- 4 दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात 2–4 डिग्री सेल्सिअसने वाढ होईल. हवामान एजन्सीने सांगितले की या काळात या भागात कोल्ड वेव्हची कोणतीही परिस्थिती होणार नाही.

रविवारी दिल्लीत किमान तापमान 8.3 अंश सेल्सिअस होते आणि सकाळीही थोडे धुक होते. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हंगामात किमान तापमान सरासरीपेक्षा एक डिग्री सेल्सिअस राहील. आयएमडीने सांगितले की, येत्या 4–5 दिवसांत वायव्य भारतातील किमान तापमानात 2- 4 अंशांची वाढ होऊ शकते. दरम्यान, सोमवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामधील दुर्गम भागात शीतलहरीची शक्यता आहे.

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस
त्याचबरोबर पश्चिम अस्थिरतेच्या परिणामामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथे 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी वेगवेगळ्या भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात 9 आणि 10 फेब्रुवारीला हिमवादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मेघालय, नागालँड आणि मणिपूरसह अनेक ईशान्य राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने समुद्री वाऱ्याच्या परिणामामुळे ईशान्य भारतातील बर्‍याच भागात पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीनुसार सोमवारी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.