Weather Updates : गुलाबी थंडीचा काळ संपला, रात्री वाढेल उष्णता; 11 मार्चपासून पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  गेल्या १४ वर्षांत हा फेब्रुवारी महिना सर्वांत उष्ण होता. दिल्लीसह अनेक राज्यांत हवामानाचा पारा अजूनही जास्त आहे; परंतु महाशिवरात्रीनंतर गरमी कमी होण्याची शक्यता आहे.

११ मार्चपासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, ११ मार्चपासून अनेक राज्यांमधील वातावरणात बदल घडण्याची शक्यता आहे. बऱ्याच राज्यात ११ मार्च ते ३ मार्चदरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘रविवार’ हा दिल्लीसाठी सर्वांत उष्ण दिवस होता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २०१२ नंतरचा कालचा रविवार सर्वांत उष्ण दिवस ठरला आहे. रविवारी कमाल तापमान सामान्य म्हणजेच ५ डिग्रीपेक्षा जास्त म्हणजे ३४ डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान १४.४ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यावेळी रविवारी दिल्लीच्या नजफगड परिसरात ३५.३ अंश सेल्सिअसने सर्वांत उष्ण दिवस ठरला. कमाल तापमान १८.६ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्याशिवाय आयानगरमध्ये सर्वाधिक ३४., क्रीडा संकुलात ३३.८ आणि रिज परिसरात ३३.५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.

आता रात्रीचे तापमान वाढण्यास सुरुवात होईल

तापमान विभागाच्या म्हणण्यानुसार, या आठवड्याच्या अखेरीस किमान तापमान १६ आणि कमाल तापमान ३४ अंश डिग्री सेल्सिअस राहील. येत्या २४ तासांत हवामान स्वच्छ राहील आणि जोरदार वारे वाहू लागेल. त्यामुळे दिवसा तसेच रात्रीही उष्णता वाढेल आणि दिल्लीतील लोकांना गुलाबी थंडी जाणवणार नाही.