Weather Updates | आगामी 5 दिवस ‘या’ भागात अलर्ट; हवामानाची स्थिती काय? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Weather Updates | मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक भागात उन्हाचा तडाखा लागला आहे. वाढत्या तापमानामुळे माणसाला दिवसभर उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दरम्यान, उष्णतेमुळे होरपळणाऱ्या उत्तर-पश्चिम भारतात (Northwest India) काल (मंगळवारी) दिलासा मिळाला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात सुमारे दोन-तीन अंश सेल्सिअसची घसरण नोंदवण्यात आली. तर आगामी पाच दिवसांमध्ये (Weather Updates) उष्णतेची लाट (Heat wave) आता कमी होईल, असं भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) सांगण्यात आले.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 7 मेपर्यंत उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश ठिकाणी आगामी पाच दिवसांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. तथापि, बुधवारपासून महाराष्ट्रातील कमाल तापमानात (Maximum Temperature in Maharashtra) 2-4 अंश सेल्सिअसने वाढ होईल, तर देशाच्या इतर भागात कोणताही विशेष बदल अपेक्षित नाही. पाच दिवसांनंतर हवामान पुन्हा 2-3 अंश सेल्सिअसने वाढेल. असं सांगितलं आहे. (Weather Updates)

 

दरम्यान, हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) आगामी 3 दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि गारपिट (Hail) होणार आहे.
या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकणार आहे, आदल्या दिवशीही सिमल्यासह (Shimla) राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट झाली आहे,
त्यामुळे राज्याचे तापमान खाली आले आहे. 4 मे रोजी चंबा, कांगडा, मंडी, सिरमौर, सोलन येथे गारपिटीसह जोरदार वाऱ्यांबाबत यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
अशी माहिती हवामान खात्याने (Indian Meteorological Department IMD) दिली.

 

Web Title :- Weather Updates | if you are planning to go out somewhere then know the weather condition imd issued this alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vitamin-D Overdose Signs | गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन-डी खाल्ल्याने काय होते? कशी असतात याची लक्षणे?

 

Curd Benefits in Summer | उन्हाळ्यात रोज खा दही, आरोग्याला होतील ‘हे’ 4 फायदे

 

Special Breakfast | नाश्त्यात काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी बनवा चविष्ठ फ्रेंच टोस्ट, मिळेल भरपूर प्रोटीन