Weather Updates : ‘या’ 9 राज्यात पावसाची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम, आसामच्या काही भागात, मेघालय, उत्तर-पूर्व उत्तर प्रदेश आणि किनारी कर्नाटकमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारतातील भाग, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, कोकण गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि मध्य प्रदेशातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशात १ जून रोजी केरळपासून मान्सून सुरू झाला होता आणि ३० जुलैपर्यंत देशात सामान्यपेक्षा एक टक्का जास्त पाऊस झाला आहे. मान्सून 30 सप्टेंबरपर्यंत असतो.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले की, चार महिन्यांच्या पावसाळ्याच्या दुसऱ्या भागात मान्सून सामान्य राहू शकतो. हवामान खात्याने २०२० मध्ये दक्षिण पश्चिम मॉन्सूनच्या दुसऱ्या सहामाहीत (ऑगस्ट ते सप्टेंबर) पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानात म्हटले की, ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९७ टक्के पाऊस होऊ शकतो.

या भागातही होईल पाऊस
उत्तर आणि पूर्व राजस्थान, गुजरात, अंतर्गत महाराष्ट्र, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागात हलका व मध्यम पाऊस होऊ शकतो. बिहार, छत्तीसगड, ओडिसा, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या भागात मान्सूनची ट्रफ आणि अक्षीय रेषा कायम
मान्सूनची अक्षीय रेषा गंगानगर, नारनौल, इटावा, वाराणसी आणि पाटणा मार्गे पूर्वोत्तर भारतातील मेघालय आणि दक्षिण आसामवर आहे. उत्तर-पूर्व उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेशच्या दक्षिण-पश्चिम भागात एक रेषा पसरली आहे.

बंगालच्या उपसागरावर पसरले आहे चक्रीवादळाचे क्षेत्र
उत्तर तमिळनाडू आणि त्यालगतच्या दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचे क्षेत्र पसरले आहे. उत्तर-पूर्व अरबी समुद्र व त्यालगतच्या पाकिस्तानवर चक्रीवादळ क्षेत्र पसरले आहे. मागील २४ तासांत किनारपट्टी कर्नाटकात बर्‍याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली.

केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे, कोकण गोवा, मराठवाडा, उत्तराखंड, उत्तर-पूर्व उत्तर प्रदेशात बर्‍याच ठिकाणी हलका ते मध्यम आणि मुसळधार पावसाची नोंद झाली.

दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीरसह या ठिकाणी झाला पाऊस
जम्मू काश्मीर, मुझफ्फराबाद, गिलगिट-बाल्टिस्तान, हिमाचल प्रदेश, पंजाब, पूर्व राजस्थान, गुजरात, दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, अंतर्गत तमिळनाडू, मध्य महाराष्ट्र, पूर्व बिहार, उर्वरित ईशान्य भारत, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. या भागात एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. दिल्ली, हरियाणा, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसामध्ये एक-दोन ठिकाणी हलका पाऊस झाला आहे.