Weather Updates | महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि MP सह देशाच्या ‘या’ भागांमध्ये कोसळणार जोरदार पाऊस, जाणून घ्या IMD चा ताजा अंदाज

नवी दिल्ली : Weather Updates | भारतीय हवामान विभागानुसार (IMD) महाराष्ट्राच्या अनेक भागात बुधवारी जोरदार पाऊस (heavy rains are likely in many parts of Maharashtra) होऊ शकतो. यासाठी आयएमडीने यलो अलर्ट (yellow alert) जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात (many parts of Maharashtra) मोठा पाऊस नोंदला जात आहे (Heavy rains have been recorded – Weather Updates).

वेदर डॉट कॉमच्या हवामान तज्ज्ञांनुसार, महाराष्ट्राच्या विदर्भ-आणि जवळपासच्या क्षेत्रात (Vidarbha and adjoining areas of Maharashtra) आज गडगडाटासह पाऊस (thundershowers today) होण्याचा अंदाज आहे. सोबतच दक्षिण बंगाल, ओरिसा, बिहार, झारखंड, किनारी आंध्र, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागात पुढील काही दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशच्या या भागात होऊ शकतो पाऊस

बंगालच्या खाडीत तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे 18 ऑगस्टनंतर राजधानी भोपाळसह जबलपुर, होशंगाबाद, इंदौर जिल्ह्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. तर 19 ऑगस्ट म्हणजे गुरुवारच्या नंतर इंदौरसह राज्यभरात मान्सूनच्या हालचालींना वेग येईल आणि पाऊस होईल. याशिवाय बिहार आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.

बिहारच्या या भागात हलका ते मध्यम पाऊस

हवामान विज्ञान केंद्र पाटणानुसार, दक्षिण मध्य बिहारच्या पाटणा, गया, नालंदा, शेखपुरा, नवादा,
बेगूसराय, लखीसराय, जहानाबाद इत्यादी क्षेत्रात मंगळवारी ढग जमा होतील. हलका ते मध्यम
पाऊस होऊ शकतो. दक्षिण बिहारच्या अनेक जिल्ह्यात पाऊस नसल्याने उष्णतेचा सामना करावा
लागेल.

हिमाचलमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट जारी

जोरदार पावसामुळे पर्वतीय भागात नद्यांना पूर आलेला आहे. हिमाचल प्रदेशात 23 ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहू शकते. शिमला हवामान केंद्राने दोन दिवसापर्यंत जोरदार पाऊस आणि वादळाचा अलर्ट जारी केला आहे. 19 ऑगस्टसाठी मैदानी आणि मध्य पर्वतीय भागांमध्ये पाऊस-गडगडाटाचा अलर्ट जारी केला आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | चुकीच्या पद्धतीने हप्ता घेणार्‍यांवर सरकारची कारवाई, राज्यांनी सुरू केली वसूली प्रक्रिया

Numerology and Career | स्वतःच्या जन्म तारखेवरून निवडा योग्य करियर, आकड्यांचा जीवनावर होणार परिणाम माहित आहे का?, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Weather Updates |  there will be heavy rain in these parts of the country including maharashtra chhattisgarh and mp know latest update of imd

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update