Weather Updates | यूपीसह ‘या’ राज्यात जोरदार पावसाचा इशारा, जाणून घ्या महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weather Updates | देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरू आहे तर भारतीय हवामान विभागाने आपल्या ताज्या अपडेटमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीनुसार, आज पूर्व यूपीमध्ये पाऊस होऊ शकतो, तसेच हरियाणा-पंजाबमध्ये मुसळधार पावसाची (Weather Updates) शक्यता आहे.

विभागानुसार, आज एमपीच्या ग्वाल्हेर, मुरैना, दतिया, टीकमगढमध्ये गर्जनेसह पाऊस होणार आहे. तसेच बंगालच्या खाडीवर कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता दिसत आहे, ज्यामुळे येत्या 4 दिवसांत म्हणजे 19 ऑगस्टपर्यंत देशाच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता
तर दिल्लीत पावसाची शक्यता कमी दिसत आहे. मात्र उद्यानंतर दिल्लीचे हवामान बदलू शकते. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यता आहे, विभागाने येथे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर राजस्थान, तमिळनाडु, केरळासह महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आज हलका पाऊस होऊ शकतो.

आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस
पुढील 3 दिवसात आसाम आणि मेघालयात जोरदार पाऊस होऊ शकतो.
हवामान विभागाने पूर्वोत्तर राज्यांना अलर्ट जारी केला आहे. तर दक्षिण भारतात सुद्धा पाऊस होऊ शकतो.
कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडु आणि तेलंगानामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकतो.
विभागाने येथे सुद्धा दोन दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.
तर पंजाब, हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

स्कायमेटने सुद्धा दिला इशारा

स्कायमेटने म्हटले आहे की, पुढील 24 तासादरम्यान तमिळनाडु, आंध्र प्रदेश, रायलसीमा, तेलंगना, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, उत्तराखंड, मध्य प्रदेशमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.

साऊथमध्ये सुद्धा होऊ शकतो जोरदार पाऊस
कर्नाटक, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगना, केरळ आणि दक्षिणी मध्य प्रदेशच्या काही भागात जोरदार पाऊस दिसू शकतो.
येथे सुद्धा दोन दिवसांचा अलर्ट जारी केला आहे.

Web Title :- weather updates thunderstorm expected in many states including uttar pradesh no rain in delhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rain In Maharashtra | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 9 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Ajit Pawar | नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Paytm पेमेंट्स बँकेच्या VISA डेबिट कार्ड यूजर्ससाठी खुशखबर ! रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळवा 20 टक्केपर्यंत सूट