होय, आता कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचा मालक व बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्याच्या जीवनावर आधारित लवकरच एक वेब सिरीज येत आहे. विजय माल्ल्याच्या जीवनावरील के गिरिप्रकाश यांचे पुस्तक ‘द विजय माल्ल्या स्टोरी’ या पुस्तकाच्या आधारावर ही वेब सिरीज बनवण्यात येणार आहे.

तनु वेड्स मनू, द अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, गॅग्स ऑफ वासेपूर असे गाजलेले चित्रपट निर्मिती करणाऱ्या सुनील बोहरा यांच्या अलमायटी मोशन पिक्चर्स कडून या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहे. याबाबतची घोषणा दिग्दर्शक प्रभलीन कौर हिने ट्विटरवरुन केली आहे. या वेबसिरीजची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आली असून अद्याप चित्रपटकरता कलाकारांची निवड करण्यात आलेली नाही. विजय माल्ल्यावरील या पुस्तकात त्याचे व्यावसायिक साम्राज्य, लग्नसंबंध यावरती लिहण्यात आले आहे. दरम्यान, इतर वेब सिरीजच्या तुलनेत ही वेब सिरीज किती यशस्वी होते हे पाहणं औत्सुक्याचे असणार हे नक्की.