Aarya Trailer : जेव्हा क्राईम आणि फसवणकू धंदा बनतो, ‘आर्या’ सीरिजमधून सुष्मिता सेनची धमाकेदार ‘वापसी’ ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन डिज्नी प्लस हॉटस्टारवरील वेब सीरिज आर्यामधून अ‍ॅक्टींगमध्ये वापसी करणार आहे. आजच (शुक्रवार दि 5 जून 2020) आर्या या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. एका गृहिणीपासून तर गँगस्टर बनण्यापर्यंतचा प्रवास यात पाहायला मिळत आहे.

या सीरिजमध्ये सुष्मिता टायटल रोल साकारत आहेत. ती 3 मुलांची आई दाखवली आहे. पती बिजनेसमन आहे. चंद्रचूड सिंह यानं तिच्या पतीची भूमिका साकारली आहे. पतीची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानंतर आर्या त्याचा बेकायदेशीर धंदा सांभाळते. मुलाचं रक्षण करण्यासाठी ती कोणत्याही पातळीला जाऊ शकते. आर्या ही सीरिज पेनोजा या डच ड्रामा सीरिजचं अप्डेशन आहे.

आर्या सीरिजबद्दल बोलायचं झालं तर राम माधवानी यांनी आर्या ही सीरिज डायरेक्ट केली आहे. त्यांनी नीरजा सारखा शानदार सिनेमा बनवला आहे. सिकंदर खेरदेखील या सीरिजचा भाग आहे. नमित दास निगेटीव रोलमध्ये आहे. ही सीरिज 19 जून 2020 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज केली जाणार आहे.

सुष्मिता सेन आर्या या वेब सीरिजमधून अॅक्टींगमध्ये कमबॅक तर करतच आहे. सोबतच तिचा हा डिजिटल डेब्यू आहे. डेब्यूसाठी ती खूप उत्साहीत आहे. सुष्मितानं सीरिजचा ट्रेलर इंस्टावरून शेअर केला आहे.

सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2010 मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2015 साली आलेल्या निर्बाक या सिनेमातून तिनं बंगाली सिनेमात डेब्यू केला होता. हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीनं डायेरक्ट केला होता. आता ती आर्या या वेब सीरिजमधून कमबॅक करत डिजिटल डेब्यू करत आहे.