‘अपहरण’च्या चाहत्यांसाठी खुशखबर ! लवकरच सुरू होणार दुसऱ्या सीजनच्या शुटींगला सुरुवात (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   2018 साली रिलीज झालेली अपहरण ही वेब सीरिज खूप लोकप्रिय राहिली आहे. चाहत्यांना याच्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा होती. आता त्यांच्यासाठी खुशखबर आहे. अपहरण 2 ची स्क्रिप्ट लिहून झाली आहे. सर्वकाही सामान्य झाल्यानंतर लवकरच याची शुटींग सुरू केली जाईल. या सीरिजचे लेखक वरुण बडोला यांनी याची पुष्टी केली आहे.

वरुण यांनी सांगितलं की, देशात कोरोना येण्याआधी आणि लॉकडाऊन लागू होण्याआधीच अपहरण 2 ची स्क्रिप्ट लिहून झाली आहे. स्क्रिप्ट त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच डायरेक्टर सिद्धार्थ सेन गुप्ता आणि प्रॉडक्शन टीमकडे पाठवली होती. स्क्रिप्टींगनंतर कास्टींग आणि प्री प्रॉडक्शनवर काम सुरू केलं गेलं होतं. परंतु मध्येच लॉकडाऊन झाल्यानं हे काम थांबवण्यात आलं आहे.

दुसऱ्या सीजनबद्दल बोलताना वरुणनं सांगितलं की, सर्व काही ठिक असलं असतं तर आतापर्यंत अपहरण 2 ची शुटींग पूर्ण झाली असती. दुसरा सीजन पहिल्यापेक्षा जास्त रोमांचक असणार आहे. लेखक असण्यासोबत वरुणनं या सीरिजमध्ये लक्ष्मण सक्सेनाची भूमिकाही साकारली होती. काही दिवसांपूर्वीच एकता कपूरनं अपहरण 2 चा टीजर शेअर केला होता.