‘बारिश 2’ च्या सेटवर पहिल्या दिवशी खूपच नव्हर्स होते अभिनेते जितेंद्र ! सतावत होती ‘ही’ भीती

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी मुलगी एकता कपूर निर्मित वेब सीरिज बारिश 2 मध्ये अनेक वर्षांनंतर ते कॅमेऱ्यासमोर आले आहेत. त्यांनी पहिल्यांदाच वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी भीती वाटत होती की ते त्यांच्या संवादातील ओळी विसरतील.

जितेंद्र म्हणाले, “मी कल्पना नव्हती केली की, मी माझ्या आयुष्यात एखाद्या वेब सीरिजमध्ये काम करेन. परंतु मी एकताला नाही म्हणू शकत नाही. तिच्या वेंचर्समध्ये काम करणं मला खूप आनंद देतं. क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतही मी केवळ तिच्या सांगण्यावरून एक छोटासा रोल प्ले केला होता. जेव्हा कधी मी कोणता शो केला आहे तो तिच्यासाठीच केला आहे.”

पहिल्या दिवसाचा शुटींगचा अनुभव सांगताना जितेंद्र म्हणाले, “पहिल्या दिवशी मी खूप नर्व्हस होतो. कारण दीर्घकाळापासून मी कॅमेरा फेस केला नव्हता. या वयात डायलॉग लक्षात ठेवणं थोडं अवघड होतं. जेव्हा मी सीन पाहिले तेव्हा त्यात मोठे मोठे डायलॉग होते. मी नर्वस झालो होतो. जेव्हा मी तरूण होतो तेव्हा पोपटासारखं पाठ करत होतो. लोकांच्या प्रतिक्रियांचीही भीती होती की, लोक म्हणतील हे साला जितेंद्रला तर काहीच येत नाही.”