‘कृष्ण अँड हिज लीला’ सिनेमावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, सोशलवर सुरूय Boycott Netflix ची मागणी ! (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा लोकांच्या निशाण्यावर आहे. यावेळी नेटफ्लिक्सवरील सिनेमा कृष्ण अँड हिज लीला (Krishna and His Leela) वादाच्या भोवऱ्यात आहे. घराघरात पूजा केली जाणाऱ्या भगवान कृष्णाची खिल्ली या सिनेमात उडवली गेलीय असा आरोप आहे. कष्णाच्या नावाच्या एका पात्राला वुमेनाईज करण्यात आलं आहे असाही आरोप आहे. यामुळंच आता ट्विटरवर #BoycottNEtflix ट्रेंड करताना दिसत आहे. खास बात अशीय की या सिनेमात बाहुबली सिनेमातील भल्लालदेव राणा डग्गुबाती हादेखील आहे. ज्यामुळं राणाही लोकांच्या निशाण्यावर आला आहे.

कृष्ण अँड हिज लीला एक तैलगू सिनेमा आहे. हा सिनेमा रविकांत पेरेपु यांनी डायेरक्ट केला आहे. या सिनेमात सिद्धू जोनलगड्डा आणि श्रद्धा साईनाथ हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात कृष्ण नावाच्या तरूणाचा प्रेमातील गोंधळ आणि त्यांचं गोंधळलेलं प्रेम याची स्टोरी आहे. सिनेमातील दोन भूमिकांची नावं राधा आणि सत्यभामा आहे. याचमुळं नेटीझन्स प्रचंड नाराज आहेत. हा सिनेमा 25 जून रोजीच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात आला आहे.

https://twitter.com/SureshBabu9T/status/1277457911829065728

एका युजरनं लिहिलं की, काय तुम्ही जाणून बुजून आमचे महान हिंदू देव कृष्णाचा अपमान करत आहात, ज्यांनी मानवतेला भगवद गीता दिली. राणा डग्गुबाती तुम्ही असं का केलंत. तुम्ही कृष्णाला वुमेनाईज केलेलं कसं दाखवलंत. आणखी एकानं राधाच्या नावावरही आक्षेप घेतला आहे. हा एका समुदायाच्या विरोधातील प्रोपोगंडा आहे असंही त्यानं म्हटलं आहे.

https://twitter.com/imGpradhan/status/1277457845382819840?s=20

एकानं म्हटलं की, नेटफ्लिक्स हिंदू समाजाचा आदर करत नाही. त्यांना फक्त वादग्रस्त कंटेट दाखवण्याशी मतलब आहे जेणेकरून प्रसिद्धी मिळेल. यातून त्यांना कमाई करायची आहे.

नेटफ्लिक्सवर दाखवले जाणारे सिनेमे आणि सीरिज अनेकदा लोकांच्या निशाण्यावर येताना दिसतात. याआधी सेक्रेड गेम्स आणि लैला बद्दलही खूप वाद झाला होता.

https://twitter.com/yugankika/status/1277457036456927232?s=20