Dolly Kitty on Netflex : भूमी आणि कोंकणाच्या ‘डॉली किट्टी’ची रिलीज डेट कंफर्म ! ‘या’ दिवशी येणार ट्रेलर

अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कोंकणा सेन शर्मा यांच्या डॉली किट्टी और वो चमकते सितारे या सिनेमाची रिलीज डेंट कंफर्म झाली आहे. हा सिनेमा 18 सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवार दि 4 सप्टेंबर रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

भूमी पेडणेकरनं इंस्टावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. भूमीनं लिहिलं की, “डॉली आणि किट्टी मूठभर समस्या आणि खूप सारी स्वपन्न घेऊन येत आहेत. ट्रेलर उद्या येईल.”

अलंकृता श्रीवास्तवनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे जिनं लिपस्टिक अंडर माय बुर्का हा सिनेमा डायरेक्ट केला होता. आता डॉली किट्टी और वो चमकते सितारे या सिनेमात भूमी आणि कोंकणा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. नेटफ्लिक्सनं देखील ट्विटरवरून पोस्ट शेअर करत सिनेमाबद्दल आणि ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे.

सिनेमाच्या प्रॉडक्शन बद्दल सांगायचं झालं तर डॉली किट्टी और वो चमकते सितारे हा सिनेमा एकता कपूरनं सिनेमा प्रोड्युस केला आहे.