कोणत्याही Subscription शिवाय अगदी मोफत पाहू शकता ‘या’ 5 लेटेस्ट Web Series ! (व्हिडीओ)

कोरोनाच्या काळात लोक ओटीटी प्लॅटॉफर्मवर मोठ्या प्रमाणात डायव्हर्ट होत आहेत. सध्या थिएटर बंद आहेत आणि काही सिनेमे आता ऑनलाईन रिलीज होत आहेत. अशात अनेक वेब सीरिजदेखील रिलीज होतना आपण पहातच आहोत. परंतु तुम्हाला यासाठी सब्सक्रिप्शनची गरज असते. आपण अशा काही धमाकेदार वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात ज्या तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता.

1) रक्तांचल – पूर्वांचलमध्ये आमनेसामने आलेल्या दोन बाहुबलींमधील ही स्टोरी आहे. क्रांती प्रकाश झा स्टारर ही सीरिज तुम्ही एकएक्सर प्लेअरवर तुम्ही पाहू शकता. सीरिज पाहताना तुम्हाला अ‍ॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर ही वेब सीरिज देखील नक्कीच आठवेल.

2) कोटा फॅक्ट्री – द व्हायरल फीवर (टीव्हीएफ) ची कोटा फॅक्ट्री खूप चर्चित वेब सीरिज आहे. शुभ मंगल ज्यादा सावधान मधील अभिनेता जितेंद्र कुमार या सीरिजमध्ये लिड रोलमध्ये आहे. कोटामधील इंजिनिअरींगची तयारी करणारे विद्यार्थी आणि कोचिंग सेंटरवर आधारीत ही सीरिज आहे. ही सीरिज ब्लॅक अँड व्हाईट आहे. तुम्ही युट्युब किंवा टीव्हीएफच्या अॅपवर ही सीरिज पाहू शकता.

3) क्युबिकल – ही सीरिज टीव्हीएफनं बनवली आहे. कॉलेजमधून बाहेर पडून एकाच कंपनी जॉईन करणाऱ्या दोन मित्रांची ही काहणी आहे. कॉलेजनंतर सुरू होणारी क्युबिकलची दुनिया यात दाखवली गेली आहे. ही स्वीट, सिंपल सीरिज तुम्ही युट्युबवर पाहू शकता.

4) वाट द फोक्स – वीर रजावत सिंह आणि रेणुका शहाणे स्टारर या सीरिजमध्ये एका विवाहित कपलची स्टोरी आहे. कुटुंब आणि नोकरीत प्रेमाचा सवाल आहे अशी याची स्टोरी आहे. डाईस मीडियाच्या युट्युब चॅनलवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. याचे दोन सीजन आले आहेत.

5) गुल्लक – टीव्हीएफची गुल्लक ही सीरिज फेमस झाली असून तिनं काही अवॉर्डही जिंकले आहेत. एका मिडल क्लास फॅमिलीतील गुल्लकची ही स्टोरी आहे. लढाई, भांडण, शेवटी प्रेम असं काही यात दाखवण्यात आलं आहे. सोनी लिव्ह वर ही सीरिज तुम्ही पाहू शकता. हा प्लॅटफॉर्म पेड आहे. परंतु या सीरिजसाठी पैसे देण्याची गरज नाही.

नोट -हॉटस्टार, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि झी 5 देखील आपल्या प्रेक्षकांसाठी काही सीरिज फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे. नेटफ्लिक्सनंही आपला ओरिजनल सिनेमा अलीकडेच युट्युबवर रिलीज केला आहे. यात लॉकडाऊनची कहाणी दाखवण्यात आली आहे.