Guilty Review : कियारा आडवाणीचा ‘गिल्टी’ पाहून नाही वाटणार ‘गिल्टी’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार कियारा आडवाणी स्टार गिल्टी हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. करण जोहरचं नवीन प्रॉडक्शन हाऊस धर्मेटीकचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. या वेब सीरिजमध्ये मीटूबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आधीच हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात क्लास, समाज आणि हिंसेवर खुबीनं भाष्य करण्यात आलं आहे. यावेळी पुन्हा एकदा मो मींस नो चा संदेश देण्यात आला आहे.

स्टोरी
सिनेमाची स्टोरी सेंट मार्टिन कॉलेजच्या आजूबााजूला फिरताना दिसते. यात विद्यार्थ्यांचा बँड ग्रुप आहे. विजय प्रताप या बँड ग्रुपचा चेहरा आहे जो स्वत:ला व्हिजे म्हणवतो. त्याला एक प्रेयसी आहे नानकी. नानकी या ग्रुपसाठी गाणी लिहित असते. या अनेक मोठ्या घरातील मुलं आहेत. यात स्कॉलरशिपनं अॅडमिशन घेणारी तन्नू कुमार आहे. तिला व्हिजे खूप आवडतो. लोकांच्या समोर ती त्याच्या क्लोज येण्याचा प्रयत्न करते. व्हिजे मात्र तिला इग्नोर करतो. यानंतर व्हॅलेंटाईन डेला व्हिजे सर्वांना घेऊन रूमवर जातो. यानंतर एक वर्षांनंतर मीटूच्या वेळी तन्नू व्हिजेवर ट्विट करत लैंगिक शोषणाचे आरोप करते. यानंतर व्हिजेचे वडिल एक मोठे नेता आहेत जे वकिलांचा फौज हायर करतात. व्हिजे गिल्टी सिद्ध होतो की, नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.

काय आहे खास ?
या सिनेमानं दिलेला संदेश खूप खास आहे. यात कियारानं दानिग बेगची भूमिका साकारली आहे. तिची अ‍ॅक्टींग पाहण्यासारखी आहे. स्टोरीत थ्रिलही भरपूर आहे. शेवटपर्यंत सिनेमात रोमांच आहे. सिनेमात जो ट्विस्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमा पाहण्यालायक वाटतो.

इथं होते निराशा
ज्या मुद्द्यावर सिनेमा तयार केला आहे त्यानुसार विचार करता हा सिनेमा आणखी संवेदनशील बनवला जाऊ शकत होता. पिंक सारख्या सिनेमाचं उदाहरण सांगता येईल. सिनेमात इंग्रजीचा अतिवापर जाणवतो. तन्नू कुमारची भूमिका आणखी मजबूत दाखवली जाऊ शकत होती. यावर पूर्ण काम केलेलं दिसत नाही. अनेक अशाही भूमिका आहेत ज्यांच्यावर लक्ष दिलं जाऊ शकत होते.