Lootcase Release Date : अ‍ॅमेझॉन प्राईमच्या ‘शुकंतला देवी’ला टक्कर देणार हॉटस्टारवरील सिनेमा ‘लूटकेस’ !

बॉक्स ऑफिसवर आपण दोन सिनेमांची टक्कर कायमच पहात असतो. आता ओटीटीवरही तुम्हाला असं दृश्य पहायला मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील सिनेमा शकुंतला देवी आणि डिज्नी प्लस हॉटस्टारवरील लुटकेस असे दोन्हीही सिनेमे 31 जुलै 2020 रोजी एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.

विद्या बालन स्टारर शुकंतला देवी या सिनेमाची घोषणा अ‍ॅमेझॉन प्राईमनं खूप आधीच केली होती. आता हॉटस्टारनं देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. दिल बेचारा सिनेमानंतर 31 जुलै रोजी कुणाल खेमू स्टारर लूटकेस हा सिनेमा ऑनलाईन रिलीज होणार आहे.

फॉर फोक्स स्टुडिओनं ट्विटरवर ट्विट करत सिनेमाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. फॉर फोक्सनं लिहिलं की, “या बॅगमध्ये काहीतरी काळं आहे. काय ही बॅग कोणाचं नशीब बदलणार आहे ? पहा लूटकेस 31 जुलैला.”

लूटकेस सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा एक कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे. यात कुणाल खेमू आणि रसिका दुगल लिड रोलमध्ये आहेत. याशिवाय या सिनेमात रणवीर शौरी, विजय राज आणि गजराज राव असेही कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. राजेस कृष्णन यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like