Weekend Plan : ‘दुर्गामती’, ‘तोरबाज’ पासून ‘बेबाकी’ पर्यंत ! OTT वर पाहू शकता ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज ! ‘इथं’ पहा ट्रेलर

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जर तुम्हाला घरबसल्या मनोरंजन हवं असेल तर या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर अनेक सिनेमे आणि वेब सीरिज पाहू शकता जे नुकतेच रिलीज झाले आहेत आणि यातील एक लवकरच रिलीज होईल. यामुळं तुमचा वीकेंड नक्कीच खास बनू शकतो.

सिनेमे –

1) दुर्गामती – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चा दुर्गामती : द मिथ (Durgamati : The Myth) हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) वर रिलीज झाला आहे.

2) अ कॉल टू स्पाय – अ कॉल टू स्पाय (A Call to Spy) हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत रिलीज झाला आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर आला आहे. डीन पिचलर डायरेक्टेड हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे. यात 3 सिनेमांची स्टोरी आहे ज्या चर्चिलच्या सिक्रेट आर्मीच्या सदस्या होत्या. या सिनेमात राधिका आपटे ही देखील लिड रोलचा हिस्सा आहे.

3) तोरबाज – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) यानं अलीकडेच कर्करोगावर मात केली आहे. यानंतर तो पुन्हा एकदा कामाला लागला आहे. गेल्या 28 ऑक्टोबर रोजी त्यानं सडक 2 सिनेमातून धमाल केली. यानंतर पुन्हा एकदा तो धमाकेदार वापसीसाठी तयार आहे. संजय दत्तचा तोरबाज (Torbaaz) हा सिनेमा 11 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स (Netflix) वर रिलीज झाला आहे. संजय व्यतिरीक्त यात नर्गिस फाखरी आणि राहु देव हेही प्रमुख भूमिकेत आहेत.

सीरिज –

1) श्रीकांत बशीर – श्रीकांत बशीर (Shrikant Bashir) सोनी लिव्ह वर रिलीज झाली आहे. हा एक हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन ड्रामा आहे. श्रीकांत आणि बशीर यांच्यावर आधारीत ही कहाणी आहे. ते मुंबईत कोरोना सारखा खतरनाक व्हायरस पसरवण्याचा दहशतवादी कट थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सलमान खीन टेलिव्हिजननं याची निर्मिती केली आहे. सीरिजमध्ये रोहित चौधरी, अश्मिता जग्गी (Ashmita Jaggi), कुणाल पंत, पूजा गोर असे कलाकार आहेत.

2) क्रिमिनल जस्टीस – डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney+ Hotstar) नं गुरुवारी (दि 11 डिसेंबर) आपल्या फ्लॅगशिप सीरिज क्रिमिनल जस्टीस : बिहाइंड क्लोज डोर्स (Hotstar Specials – Criminal Justice Behind Closed Doors. Pankaj Tripathi, Kirti Kulhari) चा ट्रेलर रिलीज केला आहे. हा सीरिजचा दुसरा सीजन आहे. क्रिमिनल जस्टीसचा पहिला सीजन खूप यशस्वी ठरला आहे. पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) पुन्हा एकदा परतले आहेत. परंतु यावेळी ते खूप गुंतागुंतीची केस लढत आहेत.

क्रिमिनल जस्टीस या सीरिजबद्ल बोलायचं झालं तर यात शिल्पा शुक्ला, अनुप्रिया गोयनका, दीप्ती नवल, आणि जिशु सेनगुप्ता हेही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही सीरिज 24 डिसेंबर 2020 रोजी रिलीज होणार आहे.

3) पती पत्नी और पंगा – पती पत्नी और पंगा (Pati Patni Aur Panga) ही सीरिज एम एक्स प्लेअर ( MX Player) वर रिलीज झाली आहे. यात अदा शर्मा, नवीन कस्तुरिया, हितेन तेजवानी आणि गुरप्रीत सैनी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अबीर सेनगुप्तानं ही सीरिज डायरेक्ट केली आहे.

4) बेबाकी – बेबाकी (Bebaakee Season 2) या सीरिजचा दुसरा भाग अल्ट बालाजी (ALTBalaji) आणि झी 5 वर स्ट्रीम करण्यात आला आहे. यात कुशाल टंडन, करण जोटवानी, शिवज्योती राजपूत आणि सुचित्रा पिल्लई प्रमुख भूमिकेत आहेत. मुझम्मिल देसाई (Muzammil Desai) आणि रवी कुमार त्यागी यांनी ही सीरिज डायरेक्ट केली आहे.