Teaser : ‘पूर्वांचल’मध्ये सुरू होणार ‘बाहुबली’ विजय सिंह आणि वसीम खान यांचं ‘गँगवार’ ! रिलीज होणार ‘रक्तांचल’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  पूर्वांचलमध्ये क्रिमिनलचा जुना इतिहास आहे. कोळसा किंवा रेल्वेच्या अनेक कंत्राटांसाठी आतापर्यंत अनेक बाहुबली आमने सामने आले आहेत. अशीच एक स्टोरी घेऊन आली आहे एमएक्स प्लेअरवरील वेब सीरिज रक्तांचल. सत्य घटनेवर आधारीत या सीरिजमध्ये दोन क्रिमिनल विजय सिंह आणि वसीम खान यांची लढाई आहे. एम एक्स प्लेअरनं दोन्ही पात्रांचा एक इंट्रो व्हिडीओ शेअर केला आहे.

विजय सिंह- तबाही का दुसरा नाम

वाराणसीत उत्पादन शुल्क विभागाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. हे कॉन्ट्रॅक्ट विजय सिंहला मिळत नाही. इथूनच वादाला सुरुवात होते. विजय सिंहाला पर्वांचलवर राज्य करायचं असतं. यासाठी तो वसीम खनसोबतही टक्कर घेतो. क्रांति प्रकाश झा नं ही भूमिका साकारली आहे. क्रांतिनं याआधी एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी, राम लीला, बाटला हाऊस अशा सिनेमात काम केलं आहे.

वसीम खान- आतंक की आवाज

वसीम खान पूर्वांचलचा मोठा बाहुबली दाखवला आहे. त्याला राजकीय समर्थनही असतं. कोळसापासून तर दारूपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याचीच ठेकेदारी असते. विजय सिंह त्याला टक्कर देतो. वसीमला त्याचं वर्चस्व कायम ठेवायचं आहे. निकितिन धीर नं ही भूमिका साकारली आहे. याआधी त्यानं चेन्नई एक्सप्रेसमध्ये थंगाबलीची भूमिका साकारली होती. याशिवाय तो सूर्यवंशी सिनेमातही काम करताना दिसणार आहे.

रिलीज डेट आणि कास्टींग

एमएक्स प्लेअरवरील ही वेब सीरिज 28 मे 2020 रोजी रिलीज होणार आहे. यात क्रांति आणि निकितिन यांच्या व्यतीरीक्त प्रमोद पाठक, चितरंजन त्रिपाठी, सौंदर्या शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत. रक्तांचलमधील दोन्ही पात्रांचे लहान टीजर रिलीज करण्यात आले आहेत.